दुस-यांदा आई होणाऱ्या मीराने पहाटे २ वाजता केली भावनिक पोस्ट!

नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे शाहीद-मीरा यांच्या कुटुंबाची चौकट लवकरच पूर्ण होणार आहे.

shahid-mira
शाहीद-मीरा

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोरदार चर्चा सुरु असून ते लवकरच दुस-यांदा आई-बाबा होणार आहे. यापूर्वी या दोघांनाही मिशा नावाची एक लहान मुलगी आहे.नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे शाहीद-मीरा यांच्या कुटुंबाची चौकट लवकरच पूर्ण होणार असून हे दोघंही नव्या पाहुण्याची वाट पाहत आहेत. सध्या मीरा तिचं बेबीबंप ऍन्जॉय करत असून या काळातले अनुभवही ती शेअर करताना दिसत आहे.

रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत राहणारी मीरा गेल्या काही दिवसापासून तिच्या प्रेग्नेंसी काळातील फोटो शेअर करताना दिसून येत आहे. या काळात तिला जाणवणारा प्रत्येक अनुभव ती चाहत्यांबरोबर शेअर करत असून नुकतीचं तिने एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट चक्क पहाटे दोन वाजता शेअर केल्याचं पाहायला मिळतं आहे.

गर्भावस्थेतील प्रत्येक अनुभव ती दुस-यांदा उपभोगत असून हा अनुभव ती तिच्या चाहत्यांबरोबरही शेअर करत आहे. पहाटे दोन वाजता तिला बाळाचा नवा अनुभव आल्यानंतर तिन तात्काळ हा अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

‘या काळामध्ये महिलांना साधी उचकी जरी लागली तरी आपलं बाळचं आपली आठवण काढत आहे असा पहिला विचार आईला डोक्यात येतो. पोटामध्ये बाळाची प्रत्येक हालचाल आईला त्याची जाणीव करुन देत असते’, असं मीराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मीराच्या या पोस्टमुळे ती नव्या पाहुण्याच्या आगमनाची किती आतुरतेने वाट पाहते  दिसून येत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या एका मुलाखतीमध्ये शाहीद आणि मीराने त्यांचा कुटुंबविस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली होता. त्यानुसार आता त्यांच्या कुटुंबाची चौकट पूर्ण होणार असल्याचं दिसून येत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mira rajput shares pregnancy problems weird at 2 am writing