Miss India Finale साठी ट्रान्सपरंट ड्रेस घालणं मलायकाला पडलं महागात

मलायका अरोरा तिच्या आउटफिट्समुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

Miss India Finale साठी ट्रान्सपरंट ड्रेस घालणं मलायकाला पडलं महागात
या कार्यक्रमातही मलायकाच्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिचा फिटनेस आणि फॅशन स्टाइल यांमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ४८ वर्षीय मलायका फिटनेस आणि फॅशनच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. नुकतीच तिने Famina miss india finele 2022 मध्ये हजेरी लावली होती. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमातही मलायकाच्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या कार्यक्रमासाठी मलायकानं ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. मात्र असं करणं तिला महागात पडलं आहे.

मिस इंडिया इव्हेंटसाठी मलायकानं गोल्डन रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेससोबत मलायकानं लाइट मेकअप केला होता. तसेच गळ्यात एक नेकपीस घालून त्याला क्लासी लुक दिला आणि केस मोकळे सोडले होते. या संपूर्ण लुकमध्ये ती खूपच सुंदर आणि कॉन्फिडन्ट दिसत होती. या इव्हेंटमधील मलायकाचा व्हिडीओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर या लुकमुळे मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे.

या संपूर्ण इव्हेंटमध्ये मलायकानं आपल्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनेकांनी तिच्या या लुकचं कौतुक केलं तर काहींना मात्र तिचा हा लुक अजिबात आवडलेला नाही आणि त्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी तिला ‘स्वस्तातली केंडल जेनर’ म्हटलंय तर काहींनी तिला चक्क ‘म्हतारी’ असं देखील म्हटलं आहे.

दरम्यान मलायका अरोराच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं तर ती मागच्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. या दोघांच्या वयातील फरकामुळे देखील त्यांना सातत्यानं सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागतं. नुकतीच मलायका आणि अर्जुन पॅरिस व्हेकेशनला गेले होते. लवकरच दोघंही लग्न करणार असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सुरु आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“लैच लवकर गेलास रं भावा…”, अभिनेते सतीश तारेंच्या आठवणीत किरण माने भावूक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी