scorecardresearch

२१ वर्षांची मिस युनिव्हर्स हरनाझ संधू वर्षाला कमावते ‘इतके’ कोटी रुपये

तिच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल

तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली. यंदाची ‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. या स्पर्धेत अभिनेत्री उर्वशी रौतेला ही परिक्षक म्हणून दिसली होती. हरनाझने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. हरनाझची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. तिच्या विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. २१ वर्षांची हरनाझ वर्षाला किती रुपये कमावते हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

मिस युनिव्हर्स होण्यापूर्वी हरनाझ संधूने २०१९मध्ये फेमिना इंडिया पंजाब ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने फेमिना मिस इंडिया २०१९मध्ये सहभाग घेतला आणि ती उपविजेती ठरली होती. ‘फिल्मीस्यापा’ने दिलेल्या वृत्तानुसार, हरनाज संधूच्या संपत्तीचा आकडा वाढला आहे. २०१७मध्ये तिची एकूण संपत्ती १ मिलियन डॉलर होती. आता २०२१मध्ये तिच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. तिच्याकडे ५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३८ कोटी रुपये संपत्ती आहे.
हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकताच कंगना रणौतने केली पोस्ट, म्हणाली…

हरनाझ मॉडेलिंग आणि चित्रपटात काम करत पैसे कमावते आहे. या शिवाय ती अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होते. ती काही ब्रँडसाठी देखील काम करते.

कोण आहे हरनाझ संधू?
चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Miss universe 2021 and actress harnaaz kaur sandhu net worth avb