तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात तरुण आणि लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रश्मिकाच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाची खूप प्रशंसा झाली आहे. पुष्पा चित्रपटामुळे तिची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे. अल्लू अर्जुन रश्मिकाची जोडी प्रेक्षकांना भावली. या चित्रपटाने ऑफिसवर बंपर कमाई केली. आता लवकरच या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या भागावरच रश्मिकाने भाष्य केलं आहे.
रश्मिका सध्या चर्चेत आहे, तिने बॉलिवूडमध्येदेखील पदार्पण केले आहे. ‘पुष्पा २’ बद्दल बोलताना रश्मिका म्हणाली, “मी पुढच्या महिन्यात चित्रीकरण करणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण याआधीच सुरु झाले आहे. दुसऱ्या भागात काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” अशा शब्दात तिने प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिने हे स्पष्ट केले.
‘RRR’ चं हॉलिवुड दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनने कौतुक केल्यावर आलिया भट्टची पोस्ट चर्चेत; म्हणाली…
‘पुष्पा’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा दिग्दर्शक सुकुमार यांनी केली होती. त्यामुळे प्रेक्षकांनाही ‘पुष्पा २’बद्दल आतुरता होती. ‘पुष्पा’पेक्षा या चित्रपटाचा सिक्वेल अधिक उत्कंठावर्धक व भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करत आहेत.
दरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या ‘वारिस’ या चित्रपटात रश्मिका झळकणार आहे. हा चित्रपट मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच ‘मिशन मजनू’, ‘पुष्पा – द रुल’ आणि ‘अॅनिमल’ या चित्रपटातही रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.