दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने या चित्रपटात आयटम साँग केले आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनची स्टाइल, गाणी, संवाद प्रचंड चर्चेत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी एका मुलाखतीमध्ये ‘हा चित्रपट कसा इतका हिट ठरला?’ असे म्हटले आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलिवूडमध्ये ४ दशक काम करत जवळपास ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी तीन वेळा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. पण इतक्या वर्षांमध्ये इंडस्ट्रीमध्ये बदल झाले का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हो, अनेक बदल झाले आहेत. पण काही गोष्टी आधी होत्या तशाच आहेत असे म्हटले आहे.
Video: अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर रानू मंडलचा मजेशीर डान्स, व्हिडीओ व्हायरल

Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

मिथुन यांनी नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले, ‘टेक्नीकली आपण खूप पुढे गेलो आहोत. अनेक बदल झाले आहेत. पण कथा आजही तशाच आहेत. फिरुन फिरुन आपण चार-पाच इमोशनभोवतीच येतो. तुम्ही राग, रोमॅन्स आणि नाती बदलू शकत नाही. आता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हाच चित्रपट पाहा ना. हा एक सिंगल स्क्रीन चित्रपट आहे. पण कसा हा चित्रपट इतका हिट ठरला? कारण लोक या चित्रपटाशी स्वत:ला रिलेट करतात.’

‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.