सुनेला सरप्राईज देण्यासाठी सेटवर पोहोचले मिथून चक्रवर्ती; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मिथून चक्रवर्ती आपल्या सुनेला म्हणजेच या मालिकेत काव्याची भूमिका साकारणाऱ्या मदालसा शर्मा हिला सरप्राईज देण्यासाठी आले होते.

Anupamaa-mithun-chakraborty-759
Mithun Chakraborty with the cast of Anupamaa. (Photo: PR Handout)

छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेली मालिका ‘अनुपमा’च्या सेटवर आज असं काही घडलं जे पाहून सेटवरचा प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला. या मालिकेच्या सेटवर मिथून चक्रवर्तींनी एन्ट्री केलीय. पण त्यांची ही एन्ट्री कोणत्या शूटिंगसाठी नव्हे तर त्यांची ही खाजगी भेट होती. मिथून चक्रवर्ती आपल्या सुनेला म्हणजेच या मालिकेत काव्याची भूमिका साकारणाऱ्या मदालसा शर्मा हिला सरप्राईज देण्यासाठी आले होते. या दरम्यान सेटवरच्या सगळ्याच कलाकारांनी सरप्राईज एन्जॉय करत फोटोज देखील क्लिक केले. हे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘अनुपमा’ फेम मदालसा शर्मा ही मिथून चक्रवर्ती यांची रिअल लाइफ सुन आहे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल. सगळ्यात विशेष म्हणजे याच मालिकेत मिथून चक्रवर्ती यांच्यासोबत ९० चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री रुपाली गांगुली सुद्धा याच मालिकेत काम करत आहेत. मिथून चक्रवर्ती आणि अभिनेत्री रूपाली गांगुली यांनी एकत्र ‘अंगारा’ चित्रपटांमध्ये काम केलंय. हा चित्रपट १९९६ साली रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रूपाली गांगुलीचे वडील अनिल गांगुली यांनीच केलं होतं.

त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर आता मिथून चक्रवर्ती यांची रिअल लाइफ सुन मदालसा शर्मा ही अभिनेत्री रूपाली गांगुली यांच्यासोबत काम करतेय. या सेटवर आल्यानंतर मिथून चक्रवर्ती यांनी अभिनेत्री रूपाली गांगुली यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच सासरे मिथून चक्रवर्तींनी अचानक सेटवर दिलेलं सरप्राइज पाहून सुन मदालसाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

या शोच्या प्रोडक्शन हाऊसने त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर मिथून चक्रवर्ती यांच्या सरप्राइज व्हिजीटचे काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करतानाच त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. “मिथून, या सरप्राइज व्हिजीटसाठी खूप खूप धन्यवाद!”, असं त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

‘अनुपमा’ या मालिकेत मदालसा ही रूपालीची सवत बनली आहे. या दोघींमधली भांडणं या मालिकेतलं यूएसपी बनलंय. काही दिवसांपूर्वीच मदालसा शर्मा हिची आई शीला देवी आणि पती मिमोह चक्रवर्ती हे सुद्धा मालिकेच्या सेटवर आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mithun chakraborty visits anupamaa set leaves daughter in law madalsa and rupali ganguly surprised prp