शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. आत्तापर्यंत चित्रपटाने ६०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. नुकतंच चित्रपटातील कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला, तेव्हा या चित्रपटाचा दूसरा भाग म्हणजेच ‘पठाण २’ येण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली, पण तुम्हाला माहितीये का की ‘पठाण २’ हा मल्याळम भाषेत आधीच बनून तयार आहे. आश्चर्य वाटलं असेल ना?

सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा सुरू आहे. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि दिग्दर्शक जितू जोसेफ हे ‘दृश्यम’सारखे दमदार चित्रपट दिल्यानंतर पुन्हा एका चित्रपटानिमित्त एकत्र आले आहेत. या दोघांचा आगामी ‘राम’ हा चित्रपट चित्रीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एका ‘रॉ ऑफिसर’च्या आयुष्यावर बेतलेला आहे आणि हा चित्रपट २ भागात प्रदर्शित होणार आहे.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
vidya balan on nepotism
“इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही”, नेपोटिझमवर विद्या बालनचं स्पष्ट विधान; म्हणाली, “सर्व स्टार किड्स…”
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

आणखी वाचा : ‘सेक्रेड गेम्स ३’ येणार नाही; अनुराग कश्यपचं मोठं विधान, दिग्दर्शकाने स्पष्ट केलं यामागील कारण

‘राम’ या चित्रपटाचा प्लॉट ऑनलाइन लीक झाला असल्यामुळे याची चर्चा होत आहे, शिवाय हा प्लॉट वाचून काही लोकांनी या चित्रपटाची तुलना ‘पठाण’शी करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्याने शेअर केलेल्या ट्वीटनुसार “हा चित्रपट रॉच्या एका गुप्तहेराला शोधण्याच्या मिशनवर बेतलेला, हा गुप्तहेर आता शत्रूच्या गोटात सामील झाल्याचं स्पष्ट झालं आहे.” अर्थात चित्रपटाच्या प्लॉटची पुष्टी अजून झालेली नसल्याने ही माहिती तेवढी महत्त्वाची नसली तरी सोशल मीडियावर ‘राम’ आणि ‘पठाण’चा संबंध जोडला जात आहे.

नेटकऱ्यांनी हा तर पठाणचा सीक्वल म्हणून ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तर मोहनलालचे काही चाहते यांनी तर्क मांडून या चित्रपटाचा बचाव केला आहे. त्यांच्या मते बहुतांशकरून स्पाय थ्रिलर चित्रपटांचे प्लॉट हे सारखेच असतात त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखी किंवा ‘पठाण’शी तुलना करण्याची काही एक गरज नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. ‘राम’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृती प्रतिक्रिया दिलेली नाही.