“बॉलिवूडमध्ये माफिया राज आहे”; घराणेशाहीवर संतापली मोनाली ठाकुर

गायिकेने दिला सोनू निगमला पाठिंबा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रसिद्ध गायक सोनू निगम याने देखील या मक्तेदारीविरोधात आवाज उठवला. सुशांतप्रमाणे संगीत क्षेत्रातील कलाकारही आत्महत्या करतील, अशी भीती त्याने व्यक्त केली. त्याच्या या विधानाला गायिका मोनाली ठाकुर हिने देखील पाठिंबा दिला आहे.

बॉलिवूड स्पायला दिलेल्या मुलाखतीत तिने भारतीय संगीत क्षेत्रातील मक्तेदारीवर भाष्य केले. ती म्हणाली, “सोनी निगमच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडला थेट जबाबदार धरता येणार नाही. कारण सुशांतने अशी कुठलीही सुसाईड नोट्स लिहिली नव्हती. परंतु भारतीय संगीत क्षेत्रात घराणेशाही आहे हे देखील नाकारता येणार नाही. काही मुठभर कंपन्या पुर्ण क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कलाकारांना मुंगी प्रमाणे बाजूला केले जाते. नव्या कलाकारांवर खरंच अन्याय होतोय.”

 

View this post on Instagram

 

You might soon hear about Suicides in the Music Industry.

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on

यापूर्वी काय म्हणाला होता सोनू निगम?

सोनू निगम याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नव्या कलाकारांसोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. “अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील अशी भीती मला वाटतेय.” असे विचार सोनू निगम याने व्यक्त केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Monali thakur support to sonu nigam over bollywood mafiagiri mppg

ताज्या बातम्या