सिंड्रेला, शँग-ची, ब्लॅकविडो… ; ‘हे’ ५ चित्रपट आणि सीरिज तुमच्या भेटीसाठी सज्ज

हा वीकेंड मनोरंजनाची मेजवानी.

cinderlla
(Photos-Loksatta File Images)

चित्रपट असो किंवा सीरिज, ज्या प्रेक्षकांना सलग न थांबता बघायला आवडतं त्या दरदी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या वीकेंडला तुमच्यासाठी एका पेक्षा एका चित्रपट आणि सीरिजची मेजवानी असणार आहे. हे सीरिज आणि चित्रपट बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित आहेत. या यादीत अॅ मेझॉन प्राइम व्हिडिओचे ‘सिंड्रेला’, मार्व्हलचे ‘शँग ची अँड दि लेजंड्स ऑफ टेन रिंग्ज’, ‘ब्लॅक विडो’, ‘फास्ट अँड फ्यूरियस ९’ आणि ‘मनी हाइस्ट’ शेवटच्या सिझनचा पहिला खंड प्रदर्शित होणार आहेत.

शँग ची अँड दि लेजंड्स ऑफ टेन रिंग्ज

मार्व्ह्लचा पहिला संपूर्ण आशियाई सुपरहिरो चित्रपट ‘शँग ची अँड दि लेजंड्स ऑफ टेन रिंग्ज’ हा चित्रपट तुम्हाला पुन्हा एकदा चित्रपटगृहाकडे वळायला भाग पाडतात. सिमु लिऊ, औकाफिना मेंझर झांग,फला चेन, बेनेडिग्ट वोंग यांच्यासह मायकेल येओ आणि टोनी लॉइंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तुम्हाला इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड अशा अनेक भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ३ सप्टेंम्बर २०२१ म्हणजे उद्या पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

फास्ट अँड फ्यूरियस ९

या सीरिजचा ९ वा भाग देखील इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. विन डिझेल आणि मायकेल रोड्रिग्ज यांच्यासोबत जॉन सेना, कार्डी बी आणि चार्लीज थेरोन यांच्यासह इतर कलाकारांनी भरलेला ‘फास्ट अँड फ्यूरियस ९’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.

सिंड्रेला

मॉडर्न परीकथा सांगणाऱ्या अॅमेझोन प्राइमच्या ‘सिंड्रेला’ चित्रपटामध्ये कॅमिला कार्बेलो हिची मुख्य भूमिका आहे. आजच्या काळातल्या ध्येयवेड्या, धाडसी आणि स्वत:ला महत्व देणाऱ्या सिंड्रेलाला एका नव्या पद्धतीने प्रस्तुत करण्यात आले आहे. स्वत:चे आयुष्य स्वत:च्या नियमांनुसार जगायचे आहे. के कॅनन यांचे दिग्दर्शन असलेल्या अॅ मेझोन प्राइमवरील ‘सिंड्रेला’ या चित्रपटात कॅमिला, इडिना मेंझेल, मिनी ड्रायव्हर, निकोलास गॅलिझिन यांच्यासह बिली पोर्टर आणि पिअर्स ब्रोसनान यांच्या भूमिका आहेत.

ब्लॅक विडो

आतंरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित झाल्यानंतर स्कार्लेट जॉन्सन यांची भूमिका असलेला ‘ब्लॅक विडो’ हा चित्रपट आता भारतातही प्रदर्शित होऊ घातला आहे. आतंरराष्ट्रीय पातळीवर धुमाकुळ घातल्यानंतर हा उत्कृष्ट चित्रपट आता भारतातही डिझने हॉटस्टारवर ३ सप्टेंबरला प्रदर्शित होतो आहे.

मनी हाइस्ट

पाचवा सिझन दोन टप्प्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. पहिला खंड ३ सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजता प्रदर्शित होणार आहे. याचा दुसरा खंड ३ डिसेंबर रोजी दुपारी १.३० प्रदर्शित होईल. हा पाचवा सिझन तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहु शकता.

तर हा वीकेंड तुमच्यासाठी सीरिज आणि चित्रपटांची मेजवानी असणार आहे एव्हढ मात्र नक्की.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Money heist season 5 to black widow series and movies that you can watch this weekend aad

ताज्या बातम्या