“२०१९ मध्ये सर्वाधिक ट्रोल मीच झाले”; अभिनेत्रीचा चकित करणारा दावा

लॉग ईन न करता ही अभिनेत्री सोशल मीडियावर झाली सर्वाधिक ट्रोल; कारण…

‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी मानसिक स्वास्थ्याचं महत्व समजावून सांगितलं. काही जणांनी त्यांच्या आयुष्यातील कटू अनुभव सांगितले तर काहींनी मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवण्याचे उपाय सुचवले. मात्र या सर्वांमध्ये अभिनेत्री मेगन मार्कलने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. २०१९ मध्ये सर्वाधिक ट्रोल मलाच करण्यात आलं होतं, असा चकित करणारा दावा तिने केला आहे.

अवश्य पाहा – “आरे कारशेड सर्व मुंबईकरांची समस्या नाही”; कंगना रणौतचा उद्धव ठाकरेंना टोला

हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, ट्विट्स आणि पॉडकास्टच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी ती ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने केलेल्या एका पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक ट्रोल मलाच केलं गेलं होतं असा चकित करणारा दावा तिने केला. ती म्हणाली, “२०१९ मधील जवळपास आठ महिने मी घरातून बाहेर देखील पडले नव्हते. मी माझ्या बाळाचं संगोपन करण्यात व्यस्त होते. या काळात मी सोशल मीडियावर देखील झळकले नाही. तरी देखील काही लोकांनी मला ट्रोल केलं. कुठल्याही मुद्द्यावरुन ते माझ्यावर टीका करत होते. तुम्ही १५ वर्षाचे आसाल किंवा २५ पण अशा प्रकारच्या ट्रोलिंगमुळे तुमचं जगणं कठीण होतं. काही जण सोशल मीडियाचा गैरवापर करत आहेत. अशा प्रकारच्या ट्रोलिंगमुळे माझ्यावर प्रचंड मानसिक ताण आला होता.”

अवश्य पाहा – ऑनस्क्रीन ‘नागिन’चा बोल्ड अंदाज; पाहा मौनी रॉयचं हॉट फोटोशूट

मेगन मार्कल ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. द क्विन, गुड बिहेविअर, व्हेन स्पार्क्स प्लाय, डेटर्स हँडबुक यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. २०१८ मध्ये तिने ब्रिटनचा राजकुमार प्रिस हॅरीसोबत लग्न केलं. त्यांचं हे लग्न काही जणांना आवडलं नाही. परिणामी तिला सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल केलं जातं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Most trolled person in the entire world in 2019 meghan markle mppg

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या