‘मदर्स डे’ निमित्त प्रेक्षकांसाठी या ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी

९ मे दुपारी १२ आणि ४ वाजता

करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात करोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था ढगमगताना दिसत आहे. त्यामुळे अनेक कलाकार लोकांना घरात राहण्याचे आवाहान करत आहेत. सध्याच्या नकारात्मक वातावरणामध्ये झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ब्लॉकबस्टर चित्रपटांची मेजवानी घेऊन आली आहे.

झी मराठी वाहिनीवर रविवारी म्हणजेच ९ मे रोजी दुपारी १२ आणि ४ वाजता दोन ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेच. त्यामधील पाहिला चित्रपट म्हणजे “लय भारी” आणि दुसरा म्हणजे “माहेरची साडी.”

रविवार ९ मे रोजी झी मराठी वाहिनीवर मदर्स डे निमित्त रितेश देशमुख, तन्वी आझमी आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असलेला सुपरहिट चित्रपट “लय भारी” दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, जयश्री गडकर, उषा नाडकर्णी आणि विजय चव्हाण यांच्या अभिनयाने नटलेला आणि ९० च्या दशकात गाजलेला सुपरहिट मराठी चित्रपट “माहेरची साडी” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mothers day special zee marathi movie avb

ताज्या बातम्या