अभिनेत्री मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत अडकली लग्नाच्या बेडीत!

मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल…

Mouni Roy Suraj Nambiar wedding,
मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल…

छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारशी लग्न बंधनात अडकली आहे. त्यांच्या हळदीचे आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर मौनीचे चाहते तिच्या लग्नाच्या फोटोंची प्रतिक्षा करत होते. आता मौनीचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

मौनी आणि सुरज यांचं लग्न मल्याळम परंपरेने झालं आहे. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो मौनीचा जवळचा मित्र अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अर्जुनने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मौनी आणि सुरज मंडपात उभे असल्याचे दिसत आहे. मौनी यात अतिशय सुंदर दिसत आहे.

आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

मौनीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून तिला लाल रंगाची बॉर्डल आहे. मौनीने सोन्याचे दागिने घातले असून तिचा हा ब्राइडल लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर दुसरीकडे सुरजने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

मौनी आणि सुरज हे गोव्यात लग्न करत आहेत. लग्ना आधी होणारे सगळे कार्यक्रम देखील तिथेच झाले आहेत. मौनी आणि सुरजच्या हळदी आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या या प्रीवेडिंग कार्यक्रमांमध्ये मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानीसोबत आणखी बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mouni roy and suraj nambiar first photo out from their wedding ceremony dcp

Next Story
“माझ्या ब्रा चे माप…”, अभिनेत्री श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देवाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी