Corona Virus : बॉक्स ऑफिसला करोनाचे ग्रहण; चित्रपटांच्या कमाईवर परिणाम

प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मोठं नुकसान सोसावं लागतंय.

चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतातही हायपाय पसरले आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्य शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव आदी शनिवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट दिसून येत आहे. याचा परिणाम चित्रपट व्यवसायावरही झालाय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईला मोठा फटका बसला आहे.

इरफान खानचा बहुप्रतिक्षित ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाने जेमतेम ४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शुक्रवारी दोन मराठी चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आले. सुबोध भावेचा ‘विजेता’ आणि अमिताभ बच्चन व विक्रम गोखले यांचा ‘एबी आणि सीडी’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र करोनाची दहशत या चित्रपटांच्या कमाईवरही दिसून येत आहे.

आणखी वाचा : “भाऊ कोणाला दुखवत नाही हे अजिबात खरं नाही”; रवी जाधवने सांगितला भन्नाट किस्सा

दिल्ली, मुंबई, कर्नाटक, केरळ, जम्मू आणि काश्मीरमधली चित्रपटगृहे काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मोठं नुकसान सोसावं लागतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Movie box office collection has been severely affected due to closure of cinema halls ssv