कोविडनंतर थिएटरकडे वळणाऱ्या प्रेक्षकांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली असल्याचं म्हंटलं जात आहे. आधी ज्यापद्धतीने लोकं चित्रपट बघण्यासाठी गर्दी करायचे तशी गर्दी आता फार कमी चित्रपटांच्यावेळी बघायला मिळते. बॉलिवूडच्या चित्रपटांवर तर प्रेक्षकांनी जाहीरपणे बहिष्कारच घातला आहे. आमिर खान आणि अक्षय कुमारसारख्या मोठमोठ्या स्टार्ससे चित्रपट सपशेल आपटले आहेत. यामागचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण कुठलं असेल तर ते ओटीटी म्हणजेच डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म!

सध्या लोकं चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्यापेक्षा तो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कधी येईल याची आतुरतेने वाट पाहतात. यामागचं कारण म्हणजे लोकांना त्यांच्या सवडीनुसार चित्रपट बघता येतो आणि एकाच प्लॅटफॉर्मवर बराच कंटेंट उपलब्ध असल्याने जास्त पैसेही खर्च करावे लागत नाहीत. Netflix सारख्या मोठ्या ब्रॅंडनेसुद्धा केवळ भारतासाठी त्यांचे चार्जेस कमी केले आहेत. याचाच अर्थ असा की भारतात डिजिटल कंटेंट पाहणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

आणखीन वाचा : Free OTT: Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar फक्त एका प्लॅनमध्ये विनामूल्य पहा; कसे ते जाणून घ्या

याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात काही भन्नाट चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित झाल्या आहेत. गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेला ‘हीट-द फर्स्ट केस’ हा चित्रपट Amazon prime या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राजकुमार राव आणि सानिया मल्होत्रा यात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट याच नावाच्या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.

याचबरोबर अभिनेत्री तापसी पन्नूचा मिथाली राज या महिला क्रिकेटपटूवरचा चरित्रपट ‘शाबाश मिट्ठू’ नुकताच Netflix या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहातही याला तितका खास प्रतिसाद लोकांनी दिला नव्हता. तसंच भारतात बनलेली उत्कृष्ट वेबसिरीज म्हणून जिला बरेच पुरस्कार मिळाले त्या ‘दिल्ली क्राइम’ या वेबसिरिजचा दूसरा सीझन २६ ऑगस्ट रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.