scorecardresearch

मृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का?

मृणालनं तिच्या मुलीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

mrunal dusanis, mrunal dusanis daughter, mrunal dusanis instagram, mrunal dusanis daughter first look, मृणाल दुसानीस, मृणाल दुसानीस मुलगी, मृणाल दुसानीस इन्स्टाग्राम, मृणाल दुसानीस वय
मृणालच्या मुलीचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मृणाल दुसानीस ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेतून मृणाल घरा घरात पोहोचली. मृणालने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या काही दिवसांपासून मृणालने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच मृणाल आई झाली असून नुकतीच तिने तिच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. मृणालच्या मुलीचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.

आई झाल्यानंतर मृणाल दुसानीसने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर तिच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते बरेच उत्सुक होते. मृणालनं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मृणालच्या मुलीची पहिली झलक पाहायला मिळत आहे. मृणालनं शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा- अभिमानास्पद! अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

इन्स्टाग्रामवर मृणालनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत यासोबतच मराठी चित्रपट आणि टीव्ही सृष्टीतील कलाकारांनी देखील कमेंट करत तिच्या मुलीचं कौतुक केलं आहे. दरम्यान मृणाल दुसानीसनं २४ मार्चला मुलीला जन्म दिला होता. मृणालनं तिच्या मुलीचं नाव नुर्वी असं ठेवलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mrunal dusanis share first look of her daughter nurvi watch video mrj

ताज्या बातम्या