‘मृणाल आत्ता हे अति होतंय’, बोल्ड फोटोमुळे मृणाल ठाकूर झाली ट्रोल

मृणालचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

mrunal thakur, mrunal thakur bold photo, mrunal thakur troll
मृणालचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणाल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता नुकतेच मृणालने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मात्र, या फोटोमुळे मृणालला सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

मृणालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. मृणालने या फोटोमध्ये काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. मृणाल खाली बसली असून ती पोज देताना दिसत आहे. मृणालचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मृणालच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी कमेंट करत तिची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

मृणालचे हे बोल्ड फोटो पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘तू पण बाकीच्यांसारखी झालीस.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अचानक तुला काय झालं, तूफानमध्ये पाहिल आणि तू आवडलीस म्हणून फॉलो केलं आणि आता हे पाहून अनफॉलो करत आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘काय राव चित्रपटात गोपी बहूच्या भूमिका आणि खऱ्या आयुष्यात दानी.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘तू ठाकूर आहेस अशी अपेक्षा तुझ्याकडून नव्हती.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मृणाल आत्ता हे अति होतंय,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मृणालला ट्रोल केले आहे.

mrunal thakur, mrunal thakur bold photo, mrunal thakur troll
मृणालच्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : आराध्या ‘कौन बनगा करोडपती’ पाहते का? बिग बी म्हणाले…

‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतून मृणालने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. एवढंच नाही तर मृणालने मराठी चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. त्यानंतर ‘सुपर ३०’ या चित्रपटातून मृणालने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यानंतर मृणाल शाहिद कपूरसोबत ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. एवढंच नाही तर त्यानंतर मृणाल दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mrunal thakur shares bold monokini pictures on social media got trolled dcp