भारतीय चित्रपटाला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या अवचित्यानिमित्त ब्रिटेनमध्ये करण्यात आलेल्या सर्वेश्रणानुसार निर्माता के.आसिफ यांचा १९६० साली प्रदर्शित झालेला ‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपट सर्वश्रेष्ठ असल्याचे लोकांचे मत आहे. ‘ईस्टर्न आय’ या ब्रिटिश आशियाई साप्ताहिक वृत्तपत्राद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. मधुबाला-दिलीप कुमार अभिनीत ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाने रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटास मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.
निर्माता के.आसिफ यांचा मुलगा अकबर म्हणाला की, माझ्या वडिलांच्या ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटास हिंदी सिनेमातील सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून निवडण्यात येणे हा मोठा सन्मान असून आमच्या पूर्ण परिवारासाठी ही गर्वाची गोष्ट आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या ५० वर्षानंतरही पूर्ण जगभरातून यास मिळणारे प्रेम पाहून माझ्या वडिलांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी दिलेले असंख्य बलिदान हे उपयुक्त असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.
हिंदी चित्रपटांमधील सर्वश्रेष्ठ १०० चित्रपटांच्या यादीत ‘मुघल-ए-आझम’नंतर ‘शोले’ हा दुर-या स्थानावर आहे. त्यानंतर क्रमानुसार ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ -३, ‘मदर इंडिया’ -४, ‘आवारा’ -५, ‘दिवार’ -६, ‘३ इडियट्स’ -७, ‘कभी कभी’ -८, ‘अंदाज’ -९ आणि ‘मैनै प्यार किया’ -१० व्या स्थानावर आहे.