मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या लाईफस्टाईलमुळे नेहमीच ते चर्चेत असतात. त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी नुकतेच त्यांचे स्वतःचे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर सुरू केले. याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगीदेखील त्यांचा राजेशाही थाट दिसून आला. या व्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे अनेकदा सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते.

मुकेश अंबानी यांच्याकडे जगभरातील अनेक महागड्या गाड्या आहेत. या गाड्या चालविण्यासाठी त्यांच्याकडे निष्णात ड्रायव्हरही आहेत. त्या ड्रायव्हरना अंबानी महिन्याला जितका पगार देतात तितका पगार एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही नसेल. दर महिन्याला अंबानी त्यांच्या ड्रायव्हरच्या पगारावर मोठी रक्कम खर्च करतात.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

आणखी वाचा : अंबानींचा शाही थाट! कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीच्या ताटातून जेवण अन् मेन्यूही होता खास

मिंटने दिलेल्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी त्यांच्या पर्सनल ड्रायव्हरला २०१७ साली दर महिन्याला २ लाख रुपये देत होते. या ड्रायव्हरचा वर्षाचा पगार तब्बल २४ लाख रुपये होता. तर २०१७ ते २०२२ दरम्यान हा पगार आणखीन वाढला आहे. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग फर्म्समधून मुकेश अंबानी त्यांच्या ड्रायव्हरची नेमणूक करतात. परंतु ड्रायव्हर्सना द्यावी लागणारी ही परीक्षा सोपी नसते.

हेही वाचा : ईशा अंबानीने परिधान केलेल्या या सिंपल ड्रेसची किंमत तब्बल…; आकडा वाचून व्हाल थक्क

या ड्रायव्हर्सना त्यापूर्वी अनेक आलिशान गाड्या चालवण्याचे ट्रेनिंग दिले जाते. हे ट्रेनिंग त्यांनी उत्तमरीत्या पूर्ण केल्यावर त्यांची नेमणूक केली जाते. याचबरोबर मुकेश अंबानी यांच्याकडे काम करणारे शेफ, सुरक्षारक्षक, घरकाम करणारे कर्मचारी यांच्या कामाचे वेळोवेळी बक्षीस देऊन कौतुक केले जाते. अंबानी यांच्यासाठी काम करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांचा विमाही काढला जातो.