Mukesh Ambani Nita Ambani Video: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचे समारंभ सुरू झाले आहेत. अनंत-राधिका यांचा संगीत सोहळा मुंबईतील बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पार पडला. या सोहळ्यात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजर राहिले. तसेच क्रिकेटपटू व राजकीय कुटुंबातील काही सदस्यांची या सोहळ्याला उपस्थिती राहिली. या कार्यक्रमासाठी मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनी एक खास परफॉर्मन्स केला, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुकेश अंबानी व त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी त्यांच्या चारही नातवंडांबरोबर गाडीत एक परफॉर्मन्स केला. आकाश व श्लोकाची मुलं पृथ्वी आणि वेदा, ईशा व आनंद पिरामल यांची मुलं आद्या व क्रिष्णा यांच्याबरोबर आजी नीता व आजोबा मुकेश यांनी 'चक्के में चक्का, चक्के पे गाडी' या ५६ वर्षे जुन्या गाण्यावर सुंदर व्हिडीओ बनवला. १९६८ साली आलेलं हे गाणं 'ब्रम्हचारी' या चित्रपटातील आहे. या चित्रपटात शम्मी कपूर, राजश्री, प्राण व मुमताज हे दिग्गज स्टार्स होते. Video: अमृता फडणवीस अन् लेक दिविजा सारखाच लूक करून पोहोचल्या अनंत-राधिकाच्या संगीतला, ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? अनेक पापाराझी अकाउंटवरून नीता अंबानी व मुकेश अंबानी यांचा नातवंडांबरोबरचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'सुंदर कुटुंब', 'छान व्हिडीओ' अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. याशिवाय अंबानी कुटुंबीय 'ओम शांती ओम' या गाण्यावरही थिकरले. राधिका व अनंत यांच्या संगीत सोहळ्यातील अनेक व्हिडीओंची सोशल मीडियावर चर्चा आहे. गरबा नाईट, शिव पूजा ते सात फेरे! १४ जुलैपर्यंत असतील अनंत-राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम, कोणते समारंभ कुठे होणार? या संगीत सोहळ्यात सलमान खान, रणबीर कपूर व आलिया भट्ट, जान्हवी कपूर व अर्जुन कपूर, रणवीर सिंह यांनी खास परफॉर्मन्स केले. अनंत व राधिकाच्या संगीत सोहळ्यात आंतरराष्ट्रीय पॉपस्टार जस्टिन बीबर यानेही परफॉर्म केलं. ८० कोटीहून जास्त मानधन त्याने या कार्यक्रमासाठी घेतलं होतं. https://www.instagram.com/reel/C9DiRQWq2pK/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== “यांचा घटस्फोट होतोय हे नक्की…”, नताशा पती हार्दिक पंड्याबरोबर नसल्याने ‘त्या’ व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचे लग्न १२ जुलै रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त दुपारी ३ वाजता आहे. लग्नाचे फेरे अँटिलिया येथे होणार आहेत. यानंतर १३ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. मग १४ जुलै रोजी जंगी रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात येईल.