scorecardresearch

Premium

“मुलाकडे सेक्सची विचारणा करणारी मुलगी असभ्य…” मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त वक्तव्य

‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

mukesh khanna

शक्तिमान या लोकप्रिय शोमध्ये ९० च्या दशकातील मुलांचे सुपरहिरो मुकेश खन्ना सोशल मीडियावर नेहमीच काही नाही काही कारणाने चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादही होतात आणि त्यानंतर मुकेश खन्ना यांच्यावर जोरदार टीका होताना दिसते. आताही असंच काहीसं घडलं आहे. मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी भडकले आहेत.

मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, “जर एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वतःहून शरीरसंबंधांसाठी विचारत असेल तर ती मुलगी असभ्य आहे. ती मुलगी, एक मुलगी नाही तर ती धंदा करणारी आहे. कारण अशा निर्लज्जपणाच्या गोष्टी सभ्य समाजातील कोणतीही मुलगी करणार नाही आणि जर ती करत असेल ती असभ्य आहे, असं करणं हा तिचा व्यवसाय आहे. यात तुम्ही सहभागी होऊ नका.”

Anshuman Vichare
Video: दादा कोंडकेंच्या गाण्यावर अंशुमन विचारेचा बायकोबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Bollywood drama queen rakhi sawant
Video: “ही पागल होत चालली आहे…” राखी सावंतच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
aishwarya and avinash narkar
Video : “रब ने बना दी जोडी”, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचे जुने फोटो पाहिलेत का?, नेटकरी म्हणाले…
parineeti chopra and raghav chadha wedding umbrella dance
लग्नात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी छत्री घेऊन केला डान्स; व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा- सलमान खानही मराठी चित्रपटाच्या प्रेमात! अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ २’साठी लिहिली खास पोस्ट

सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलांबाबत त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेटकरी प्रचंड संतापलेले दिसत आहे. मुकेश खन्ना यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

आणखी वाचा- ‘शक्तिमान’ आता मोठ्या पडद्यावर, सुपरहिरोच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला ऑफर

मुकेश खन्ना यांच्या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “किमान स्त्री शक्तीचा तरी मान ठेवायला हवा होता” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “जेव्हा शक्ती आणि मान दोन्ही गोष्टी माणसाला सोडून जातात तेव्हा तो असं बोलू लागतो.” तर आणखी एकाने मुकेश खन्ना यांच्यावर टीका करताना म्हटलंय, “माहीत नव्हतं की इच्छा आणि महिलांची संमती त्यांना सेक्स वर्कर ठरवतात.” तसेच एका युजरने तर मुकेश खन्ना यांच्यावर राग व्यक्त करत लिहिलं, “शक्तिमान म्हातारपणात काहीही बरळतोय, आता तो सनकीमान झाला आहे.” एकूणच मुकेश खन्ना यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mukesh khanna controversial statement about sex and women video viral mrj

First published on: 10-08-2022 at 08:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×