ठरलं! या दिवशी होणार ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील साजिरी आणि शौनकचा विवाहसोहळा

अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर साजिरीचे स्वप्न होणार पूर्ण

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून साजिरी आणि शौनकच्या लग्नाची उत्सुकता होती. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अखेर साजिरी आणि शौनक विवाहबंधनात अडकणार आहे. साजिरी आणि शौनकला आशीर्वाद देण्यासाठी स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, फुलाला सुगंध मातीचा आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतले कलाकार खास हजेरी लावणार आहेत.

‘मुलगी झाली हो’मधील साजिरी आणि शौनकच्या लग्नसोहळ्याला मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे जज सचिन पिळगावकर, सूत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी यांची देखिल खास उपस्थिती असणार आहे. २१ नोव्हेंबरला २ तासाच्या विशेष भागामध्ये मुलगी झाली हो मालिकेतला हा शाही विवाहसोहळा प्रेक्षकांना पहाता येईल.

मालिकेतल्या या लग्नसोहळ्यासाठी साजिरी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर खूपच उत्सुक आहे. लहानपणापासून ज्याचं स्वप्न पाहिलं त्या शौनकशी विवाह होत असल्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. या विवाहसोहळ्यासाठी साजिरीचा खास लूक डिझाइन करण्यात आला आहे. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नातला लूक बऱ्याच लूक टेस्ट घेतल्यानंतर फायनल करण्यात आला आहे. नववधूच्या रुपात स्वत:ला पाहिल्यानंतर माझं खरंच लग्न होतंय असं वाटत होतं. त्यामुळे मी आणि मुलगी झाली हो मालिकेची संपूर्ण टीम या खास विवाहसोहळ्यासाठी उत्सुक आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mulgi jhali ho serial update sajiria and shaunak wedding avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या