scorecardresearch

मुलगी झाली हो : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता घेणार किरण माने यांची जागा

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय भूमिका घेतल्याचे म्हणत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

mulgi jhali ho, vilas patil, kiran mane,
'मुलगी झाली हो' या मालिकेतून किरण माने यांना वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय भूमिका घेतल्याचे म्हणत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आणि विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने सतत चर्चेत आहेत. किरण माने यांना अचानक एक दिवस मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एकीकडे किरण यांनी दावा केला की, त्यांनी वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय भूमिका घेतल्या म्हणून त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर, दुसरीकडे मालिकेतील महिला सहकलाकारांसोबत ते गैरवर्तवणुक करायचे आणि अपशब्द वापरायचे, यासाठी किरण यांना पूर्वसूचना देण्यात आली होती. पण तरीही त्यांच्यात बदल झाला नाही, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं, असे निर्माते म्हणाले होते. आता किरण माने गेल्यानंतर विलास पाटीलची भूमिका आता कोण साकरणार असा प्रश्न सगळ्या चाहत्यांना पडला आहे.

रिपोर्टनुसार, ‘मुलगी झाली हो’ मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे विलास पाटीलची भूमिका साकारणार आहे. सध्या तरी याविषयी प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. आनंद याआधी ‘रुद्रम’ मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने ‘बंदिशाळा’, ‘जोगवा’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. तसंच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. परंतु आता तो ‘मुलगी झली हो’ मालिकेत विलास पाटीलच्या भूमिका कशी साकारणार आणि तो किरण माने यांची जागा घेऊ शकले का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले.

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

आणखी वाचा : “हत्ती खूप झाले आहेत आता माहूत पाठव…’, संदीप देशपांडेंनी सांगितला राज साहेबांचा ‘तो’ मजेदार किस्सा

दरम्यान, किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर मालिकेचं एक नवीन पोस्टर समोर आलं ज्यात किरण माने यांना वगळण्यात आले होते. किरण यांनी साकारलेल्या विलास पाटीलच्या भूमिकेसाठी त्यांचं नेहमीच कौतुक होत असे. तसेच त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून काढून टाकल्याने मालिकेचे चाहते प्रचंड नाराज आहेत. सोशल मीडियावर #istandwithkiranmane असा हॅश-टॅग ट्रेण्ड झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mulgi jhali ho this actor is going to play the vilas patil role dcp

ताज्या बातम्या