अभिनेत्याकडून ५० हजार लुटणारा आरोपी अखेर गजाआड, योगेश सोहनीने मानले पोलिसांचे आभार

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

yogesh-sohani

‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतील मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणाऱ्या योगश सोहनीला काही दिवसांपूर्वी मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर लुटण्यात आलं होतं. एका कार चालकाने त्याला संमोहित करून ५० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर योगेशने तातडीने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. योगेशच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेचच सूत्र हलवली. आणि अवघ्या दोन दिवसात या आरोपीला गजाआड करण्यात आलंय.

अभिनेता योगेश सोहनीनेच एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली आहे. तसचं त्याने पोलिसांसह अनेकांचे आभार मानले आहेत. ८ मेला ही घटना घडली होती. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करत असताना एका व्यक्तीने योगेशला अडवलं. त्याला दमदाटी केली आणि त्याच्याकडील ५० हजार रुपये काढून घेतले. संमोहनामुळे आपल्याला फार काही करता आलं नसल्याचं योगेश म्हणाला आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात त्याने तक्रार दाखल केली. पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रान्चच्या टीमने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि दोन दिवसातच आरोपीला गडाआड करण्यात आलं. आरोपीची ओळख पटलेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yogesh Sohoni | Actor (@yogeshsohoni)

आरोपीला अटक केल्यानंतर योगेशने व्हिडीओ शेअर करत त्याला मदत करणाऱ्या सर्व पोलिसांची आभार मानले आहेत. या काळात त्याला अनेकांनी फोन करून विचारपूस केली. या सर्वांचे आभार मानत त्याने चाहत्यांबद्दलही आभार व्यक्त केले आहेत.

पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून हा व्हिडीओ शेअर करत अशा घटनांपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत योगेश शौनक ही मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांटी मोठी पसंती मिळतेय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mulgi zali ho fame actor yogesh sohani robbed police arrested accused yogesh share video to thanks police kpw

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या