राज कुंद्राची कानपूरमधील बँक खाती सील ; कोट्यावधींच्या व्यवहारांसोबतच मोठी माहिती समोर

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्टेट बँक ऑफ इंडियाला राज कुंद्राची कानपूरमधील दोन खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत

raj-kundra-income
(Photo-Instagram@Raj Kundra)राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होवू लागली आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्राचंची टीम कसून चोकशी करत असतानाच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे समोर येत चालले आहेत. दररोज होणाऱ्या नवनवीन खुलास्यामुळे राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होवू लागली आहे. यातच आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्टेट बँक ऑफ इंडियाला राज कुंद्राची कानपूरमधील दोन खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बँक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या दोन्ही खात्यांमध्ये करोडो रुपये जमा करण्यात आले होते.

रविवारी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राची कानपूरमधील दोन खाती सील करत कारवाई केली आहे. यावेळी राज कुंद्राशी संबधीत आणखी मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागलीय. सुत्रांच्या माहितीनुसार राज कुंद्राची प्रोडक्शन कंपनी अरविंद श्रीवास्तव चालवत होता. तर व्यवहारातील पैसे हे अरविंदची पत्नी हर्षिताच्या खात्यावर ट्रांसफर केले जात होते.

आणखी वाचा: शिल्पा आणि राज कुंद्राच्या ‘या’ बँक खात्यावर क्राइम ब्रांचची नजर; समोर आली मोठी माहिती

श्याम नगर परिसरात राहणाऱ्या अरविंदच्या वडिलांनी एएनआय वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अरविंद गेल्या दोन वर्षांपासून घरी न आल्याचं सांगितलं आहे. अरविंद घरी आला नसला तरी तो दर महिन्याला घर खर्चासाठी पैस पाठवत असल्याचं ते म्हणाले. २०२१ सालामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अरविंद श्रीवास्तवसाठी लूकआउट नोटिस जारी केली होती अशी माहिती अरविंदचे वडील एनपी श्रीवास्तव यांनी दिली आहे. तसचं अरविंदच्या कामाबद्दल आणि हर्षिताच्या खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेबद्दल आपल्याला कोणतीच कल्पना नसल्याचं एनपी श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलंय.

आणखी वाचा: आमिर खानच्या लेकीने शेअर केला फोटो, ‘तो’ बॉक्स पाहून नेटकऱ्यांनी विचारला सवाल

पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राची पोलिस कस्टडी आज म्हणजेच २७ जुलै पर्यंत असून आज मुंबई हाय कोर्टात पुढील सुनावणीसाठी राज कुंद्राला हजर केलं जाणार आहे. दरम्यान राज कुंद्राचे वकील सुभाष जाधन यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumabi crime branch seized raj kundra bank accounts in kanpur another matter came in light kpw

ताज्या बातम्या