scorecardresearch

महापौर किशोरी पेडणेकरांनी करीनाला फटकारलं; म्हणाल्या, “तिला दोन लहान मुलं…”

मागच्या काही दिवसांमध्ये करीनाने अनेक पार्ट्यांना हजेरी लावली असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

MUmbai,Kishori Pednekar,COVID-19, kareena kapoor khan,

सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर खान आणि अमृता अरोरा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:ला घरात क्वारंटाइन करुन घेतले आहे. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये करीना आणि अमृताने अनेक पार्ट्यांना हजेरी लावली असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी करीनाने करोना नियमांचे पालन न केल्यामुळे तिला फटकारले आहे.

‘करीनाच्या घरी तिची दोन मुले आहेत. करोनाचे संकट गेले नसताना निष्काळजीपणे वागणे करीनाला शोभत नाही. ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीला करीनाने हजेरी लावली होती त्यामुळे त्या पार्टीला हजर असणाऱ्यांशी आम्ही संपर्क साधत आहोत’ असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
PHOTOS: बॉबी डार्लिंग आठवतेय का? आता दिसतेय ‘अशी’! एकेकाळी बारमध्ये डान्स, लिंग बदल अन्…

पुढे त्या म्हणाल्या, ‘अशा पार्टीत काही किशोरवयीन मुले उपस्थित असतील तर मी समजू शकतो. हे त्यांचे वय आहे आणि त्यांना अशा गोष्टींचा आनंद घ्यायला आवडतो. परंतु लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. जे लाइमलाइटमध्ये आहेत, त्यांना करोनाची भीती का वाटत नाही? आम्ही अशा लोकांविरोधात करोनाचे नियम मोडल्यामुळे का कठोर कारवाई करु नये?’

“सध्याच्या परिस्थितीत, आमचे लोकांना आवाहन आहे की त्यांनी कोविड-19 नियमांचे पालन करावे. अनलॉक मार्गदर्शक तत्त्वांचा एक भाग म्हणून, आम्ही मेळावे आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याच्या बाबतीत शिथिलता दिली. मात्र, काही लोक आणि हॉटेल्स याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसते,” पेडणेकर म्हणाल्या.

करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना करोनाची लागण झाली असल्याच्या संदर्भात एएनआयने ट्वीट केले होते. दरम्यान या दोघींनीही कोणत्याही करोना नियमांचे पालन न करताच अनेक पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही अभिनेत्रींमुळे अनेकांना करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai mayor kishori pednekar slam kareena kapoor khan after tested covid 19 positive avb

ताज्या बातम्या