अभिनेता रणवीर सिंग हा कायमच त्याच्या कपड्यांमुळे चर्चेत असतो. मात्र मध्यंतरी तो अंगावर एकही कापड न ठेवता केलेल्या नेकेड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता. वेगवेगळ्या कारणांसाठी इंटरनेटवर चर्चेत राहणारा रणवीर त्याच्या खासगी आयुष्यामुळे आणि हटके स्टाइल स्टेटमेंटमुळे चर्चेत असतो. ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी रणवीर सिंगने न्यूड (पूर्ण नग्नावस्थेत) फोटो शूट केलं. यावर चांगलाच गदारोळ माजला. काही लोकांनी रणवीरच्या या बोल्ड अंदाजाचं कौतुक केलं तर काहींनी त्याच्यावर सडकून टीका देखील केली होती.

रणवीरच्या या अशा फोटोशूटमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. काही ठिकाणी पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर FIR सुद्धा दाखल करण्यात आली होती. आता याच संदर्भात मुंबई पोलिसांनी रणवीरला समन्स बजावले असल्याचं समोर येत आहे. न्यूड फोटोशूट प्रकरणी अभिनेता रणवीर सिंहला मुंबई पोलिसांनी २२ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. त्याआधीच रणवीरने मुंबई पोलिसांसमोर हजेरी लावणं बंधनकारक आहे.

राज्य महिला आयोगाने रणवीर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर बराच गदारोळ सुरु झाला होता. त्यासंदर्भातले अपडेटसुद्धा समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या वतीने केस लढणारे वकील आशीष राय यांनी याबाबतीत खुलासा केला आहे. त्यांच्या मते “रणवीरचं हे इतकं बोल्ड वर्तन राज्यातील महिलांच्या आणि लहान मुलांच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य आहे. त्याशिवाय ते कायद्याच्या चौकटीत न बसणारं आहे.” शिवाय मुंबईतील चेंबुर पोलिस स्टेशनमध्येदेखील रणवीर विरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत तक्रार नोंदवली गेली आहे आणि मुंबई पोलिस त्याचाही पाठपुरावा करत आहे. या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊनच पोलिसांनी रणवीरला २२ ऑगस्टपर्यंत हजेरी लावण्याची नोटिस पाठवली आहे. जर रणवीरने २२ ऑगस्टपर्यंत मुंबई पोलिसांसमोर हजेरी लावली नाही तर त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकते असंही म्हंटलं जात आहे.

“हे खूप अति झालं” रणवीर सिंहनंतर ‘बिग बॉस’ फेम असिम रियाजचा न्यूड लूक पाहून नेटकऱ्यांना राग अनावर

रणवीर हा करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेमकाहानी’ या सिनेमात आलिया भट्टबरोबर झळकणार आहे. सिनेमाचं शूटिंग सुरू असून त्याची एक झलकदेखील प्रेक्षकांनी पाहिली आहे. याबरोबरच रणवीर पुन्हा एकदा दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर सर्कस या सिनेमाच्या निमित्ताने काम करणार आहे. साऊथच्या सुपरहीट अशा अपरिचित या सिनेमाच्या रिमेकमध्ये रणवीर झळकणार आहे. मूळ सिनेमाचा दिग्दर्शक शंकर हाच या रिमेकचंही दिग्दर्शन करणार आहे.