‘बिजली इधर गई पर फ्युज…’; कुणाल कामराने कंगनाची उडवली खिल्ली

कंगना रणौत- कुणाल कामरामध्ये शाब्दिक चकमक

मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये आज सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान अचानकपणे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकारानंतर अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करुन नाराजी व्यक्त केली. सोबतच तिने शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना टोला लगावला आहे. मात्र, तिच्या ट्विटनंतर कुणाल कामरानेदेखील कंगनाची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं.

कंगनाने ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमधील संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुणाल संजय राऊत यांना खेळण्यातील जेसीबी देताना दिसत आहे. सोबतच तिने मुंबईतील लाइट गेले आहेत, असं म्हटलं आहे. तिचं हे ट्विट पाहिल्यानंतर कुणाल कामराने तिची खिल्ली उडवली आहे.

“बिजली गई इधर पर फ्युज आपका क्यूँ उड रहा हैं”, असं कुणाल कामरा म्हणाला आहे. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा- कुणाल कामरा-संजय राऊत यांच्यातील ‘जेसीबी’ भेटीवरून कंगना संतापली; म्हणाली,…

कुणाल कामराने ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमध्ये संजय राऊत यांना खेळण्यातील जेसीबी दिल्यामुळे कंगनाचा संताप अनावर झाला आहे. तिच्या ऑफिसवर महानगर पालिकेने केलेल्या कारवाईची ही खिल्ली उडविण्यात आल्याचं कंगनाने म्हटलं आहे. तेव्हापासून कंगना, कुणाल यांच्यात शाब्दिक चकमकच सुरु असल्याचं दिसून येत आहे.

आणखी वाचा- कुणाल कामराने संजय राऊत यांना भेट दिला ‘JCB’

दरम्यान, मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता, तो आता पूर्ववत झाला आहे. सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत होते. बेस्टनं यासंदर्भातील ट्विटरवरुन माहिती दिली होती. टाटाकडून करण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai powercut kangana ranaut tweet kunal kamra reply ssj

Next Story
गॉसिप