‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील ‘थंगबली’ची मुंबईतील रेस्तराँ मालकालाही पडली भुरळ

…आणि दीपिका पदुकोणलाही झाले हसू अनावर

shah rukh khan, nikitin dheer, deepika padukon
शाहरूख खान, निकितिन धीर, दीपिका पदुकोण

शाहरूख आणि दीपिकाचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका प्रशंसनीय होती. त्यापैकी थंगबलीची भूमिका आणि हे अनोखे नाव प्रेक्षकांना विशेष लक्षात राहिलं. या भूमिकेची आठवण पुन्हा काढायचे कारण असे आहे की मुंबईतील माहिम येथून गाडीतून जात असताना अभिनेत्रीला दीपिका पदुकोणला ‘थंगबली’ नावाचा रेस्तराँ दिसला आणि हे रेस्तराँचे हे नाव वाचून ती आश्चर्यचकित झाली.

दक्षिण मुंबईतील आपल्या घरी परतत असताना माहिम येथे दीपिकाला हा दाक्षिणात्य रेस्तराँ दिसला. आपल्या चित्रपटातील भूमिकेचे हे नाव इतके प्रचलित झाल्याचे पाहून तिला सुखद धक्का बसला. त्याच क्षणी तिने ही गोष्ट ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या टीमलासुद्धा सांगितली आणि ते देखील आश्चर्यचकित झाले. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील मीनम्माची भूमिका ही दीपिकाची सर्वांत आवडती असून त्या रेस्तराँला दीपिका लवकरच भेट देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

वाचा : …म्हणून शाहरूख सध्या ‘महाभारत’ वाचतोय

‘थंगबली’ हे नाव वाचताच चित्रपटाच्या अनेक आठवणी जागृत होऊन हसू अनावर झाल्याचे दीपिकाने आपल्या टीमला सांगितले. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटात थंगबलीची भूमिका अभिनेता निकितिन धीर याने साकारली होती. निकितिन धीर हा ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचा मुलगा आहे.

VIDEO : कतरिना रणबीरला म्हणतेय ‘माझ्या डोळ्यात बघ’

दाक्षिणात्य पदार्थ आवडत असल्याने दीपिका ‘थंगबली’ रेस्तराँला लवकरच भेट देणार आहे. त्यामुळे रेस्तराँच्या मालकाला हे नाव दिल्याचे सार्थक नक्कीच होईल असे म्हणायला हरकत नाही. अभिनेत्री दीपिका सध्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात दीपिकाचा कथित प्रियकर रणवीर सिंगसुद्धा भूमिका साकारणार आहे. शाहिद कपूरचीदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai restaurant named as thungabali inspired from chennai express movie character

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या