मुंबईचा टॅक्सी ड्राइव्हर आला शिव ठाकरेच्या मदतीला धावून

टॅक्सी वाले सुपरहिरो दादा.. म्हणत शिवने फेसबुकवर लिहिली पोस्ट

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी जगत असतो असं अनेकजण म्हणतात. मात्र माणुसकीची जाणीव ठेवत काहीजण लोकांच्या मदतीला धावून येतानाची उदाहरणंही पाहायला मिळतात. ‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेसोबत असंच काहीसं घडलं. मुंबईचा एका टॅक्सी ड्राइव्हर शिव ठाकरेच्या मदतीला धावून आला.

शिवचा महागडा मोबाइल फोन हरवला होता. त्याने मरिन लाइन आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. पण मुंबईच्या एका टॅक्सी ड्राइव्हरला शिवचा फोन सापडला आणि त्यांनी तो सुखरुप शिव ठाकरेला परत केला. याविषयी कृतज्ञता व्यक्त करत शिवने सोशल मीडियावर टॅक्सी ड्राइव्हरसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांचे आभार मानले. ‘टॅक्सी वाले सुपरहिरो दादा.. फक्त कथांमध्ये नाही तर खऱ्या आयुष्यातही असं घडतं. या दादांना माझा फोन सापडला आणि त्यांनी तो मला परत आणून दिला. तर दुसरीकडे पोलिसांनीही मला सहकार्य केलं. तुम्हा सर्वांचे खूप आभार’, असं त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

शिव ठाकरे हा ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. या रिअॅलिटी शोमधून तो घराघरांत पोहोचला. वीणा जगताप आणि शिव ठाकरेच्या रिलेशनशिपचीही जोरदार चर्चा झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai taxi driver helped bigg boss marathi fame shiv thakare ssv

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या