Big Boss 16 : नव्या सीझनमध्ये सहभागी होणार ‘हे’ १७ स्पर्धक?, मराठी ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाचाही समावेश

हिंदी ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? यांची नावं समोर आली आहेत.

Big Boss 16 : नव्या सीझनमध्ये सहभागी होणार ‘हे’ १७ स्पर्धक?, मराठी ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाचाही समावेश
हिंदी 'बिग बॉस'च्या नव्या पर्वाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? यांची नावं समोर आली आहेत.

छोट्या पडद्यावरील सगळ्यात बहुचर्चित कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या वर्षीपासून ‘बिग बॉस’ ओटीटीचं पहिलं पर्व प्रदर्शित झालं. अभिनेत्री दिव्या अग्रवाल या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. तसेच ‘बिग बॉस १५’मध्ये देखील ओटीटी ‘बिग बॉस’मधील काही स्पर्धक दिसले. आता पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाची चर्चा सुरु झाली आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? हे आता समोर आलं आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या बिनधास्त मुलीची मराठी मालिकेमध्ये एण्ट्री, मालवणी भाषा बोलताना दिसणार

हिंदी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांची यादी
‘बिग बॉस १५’ सुपरहिट ठरल्यानंतर पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या पुढील पर्वाचं सुत्रसंचालन सलमान खानच करणार आहे. तसेच ‘बिग बॉस’ ओटीटीच्या नव्या पर्वासाठी अशा स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे जे स्पर्धक ‘बिग बॉस १६’मध्ये देखील सहभागी होतील. अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, मुनव्वर फारुकी, शिवम शर्मा, पूनम पांडे, अजमा फल्लाह, शिवांगी जोशी, फैजल शेख, जन्नत जुबैर, मुनमुन दत्ता हे स्पर्धक ‘बिग बॉस’ ओटीटीच्या नव्या पर्वामध्ये सहभागी होतील.

त्याचबरोबरीने टीना दत्ता, जैद दरबार, बसीर अली, आरुषी दत्ता, केविन अल्मासिफर, कॅट क्रिस्टियन आदी कलाकार देखील सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवाय मराठी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेला अभिनेता जय दुधाणे देखील ‘बिग बॉस’ ओटीटीमध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा – Photos : दुबईनंतर अमृता फडणवीस यांचा लंडन दौरा, ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्काराने सन्मान

‘बिग बॉस’ ओटीटीचं सुत्रसंचालन कोण करणार?
‘बिग बॉस’ ओटीटीच्या पहिल्या पर्वाचं सुत्रसंचालन दिग्दर्शक करण जौहरने केलं होतं. पण नव्या पर्वाचं सुत्रसंचालन कोण करणार? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. फराह खान या पर्वाचं सुत्रसंचालन करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता अभिनेता रणवीर सिंग ‘बिग बॉस’ ओटीटीच्या सुत्रसंचालनची धुरा सांभाळणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Munawar faruqui divyankar tripathi arjun bijlani and other many actors part as contestants of bigg boss ott 2 see details kmd

Next Story
Bigg Boss OTT 2 : कोण करणार दुसरा सिझन होस्ट?
फोटो गॅलरी