Munawar Faruqui insults Marathi Manus : स्टॅन्ड अप कॉमेडियन व बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी हा सतत वादग्रस्त वक्तव्ये करत असतो. त्याच्या स्टॅन्ड अप कॉमेडी कार्यक्रमात तो उपस्थित प्रेक्षकांना टोमणे मारून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. यातूनही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. यावेळी त्याने स्टॅन्ड अप कार्यक्रमात कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरले असून त्याच्यावर टीका सुरू झाली आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

मुनव्वर फारुकीने त्याच्या मुंबईत आयोजित स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना विचारलं की “तुम्ही सर्वजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातूनच आलेले आहात का? तुमच्यापैकी कोणी लांब राहतं का? कोणी लांबचा प्रवास करून इथे आलंय का?” त्यावर प्रेक्षकांमधून कोणीतरी होकारार्थी उत्तर दिलं. त्यावर फारुकीने विचारलं, “कुठून आलात?” त्यावर समोरून उत्तर आलं, “तळोजा, मुंबईबाहेरून आलोय”. यावर फारुकी म्हणाला, “हे लोक आज सांगतायत की प्रवास करून आलोय, अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात, कुठे राहता? तेव्हा हेच लोक त्यांच्या गाववाल्यांना सांगतात, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक सगळ्यांना च** बनवतात.”

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Cab Diver Video Viral on Social Media
Cab Driver : भारताबाबत अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानी माणसाला टॅक्सी चालकाने उतरवून हाकललं, कुठे घडली घटना?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
UWW president Nenad Lalovic Statement on Vinesh Phogat Case
Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray on Badlapur School Case
Raj Thackeray on Badlapur School Case : बदलापूर प्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप; पोलिसांना म्हणाले, “मुळात या घटनेत…”
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

फारुकी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तळोजावरून आलेल्या प्रेक्षकांना विचारलं, “तुम्ही कोकणी आहात का?” त्यावर समोरून होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तो जोरजोराने हसू लागला. फारुकी असे विनोद करत असताना उपस्थितांमधील लोक शिट्ट्या व टाळ्या वाजवून दाद देत होते.

हे ही वाचा >> “साऊथचे कलाकार शिस्तप्रिय अन्…”, तेजस्विनी पंडितने सांगितला अनुभव; दाक्षिणात्य चित्रपटातील जबरदस्त लूक आला समोर

फारुकीकडून हिंदू देवतांचा अपमान

फारुकीने यापूर्वी अशाच स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये हिंदू देवतांचा अपमान केला होता. २०२१ मध्ये त्याला याप्रकरणी अटकही झाली होती. हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे त्याच्याविरोधात अनेक राज्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा >> Kiran Mane : “मराठा विरुद्ध मराठेतर समाज अशी स्पॉन्सर्ड आग लावायची अनाजीपंती खेळी..”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

मुनव्वर फारुकी कोण आहे?

फारुकी हा एक कॉमेडियन व रॅपर म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनेक कविता, किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस’च्या आधी मुनव्वरने ‘लॉकअप’च्या पहिल्या सीझनच्या विजेतेपदावर नाव कोरलं होतं. तेव्हापासून लोकप्रिय झाला. त्याच्या जन्म २८ जानेवारी १९९२ रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला. आईच्या निधनानंतर तो मुंबईला आला. २०२० मध्ये मुनव्वरच्या वडिलांचं निधन झालं. दरम्यान, ‘दाऊद, यमराज औरत’ या म्युजिक व्हिडीओमुळे त्याला करिअरमध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.