Munawar Faruqui Baby Girl News: अभिनेता, स्टँडअप कॉमेडियन व बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मुनव्वर फारुकी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. दोन वर्षांपूर्वी मुनव्वरने मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोटवाला हिच्याशी दुसरं लग्न केलं होतं.
मुनव्वर फारुकीने रात्री इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने ४ फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत त्याने मेहजबीनचा हात हातात घेतलाय आणि खाली बाळ झोपलेलं दिसतंय. मात्र त्याचा बाळाचा चेहरा दिसत नाही. दुसरा फोटो रुग्णालयाच्या खिडकीतून काढलेला आहे, त्यात मुंबईतील इमारती दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत बाळ झोपलेलं दिसतंय. चौथ्या फोटोत मेहजबीनने बाळाला हातात पकडलंय. पण दोघींचेही चेहरे फोटोत दिसत नाहीत.
मुनव्वर फारुकीची पोस्ट
मेहजबीन कोटवाला हिने मुलीला जन्म दिला आहे. मुनव्वर फारुकीने फोटो शेअर करून लिहिलं, “घर बरकत आई, दुआ में याद रखना”.
मुनव्वरच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्स करून त्याचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर वरुण धवनसह फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करून त्याला या नवीन अध्यायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मुनव्वर व मेहजबीन यांचं हे एकत्र पहिलं बाळ आहे. दोघांनाही त्यांच्या पहिल्या लग्नापासून एकेक अपत्य आहे. मुनव्वर फारुकीला मुलगा आहे, तर मेहजबीन कोटवाला हिला पहिल्या लग्नापासून मुलगी आहे. आता दोघांना मुलगी झाली आहे.
मुनव्वर फारुकीचे लग्न, घटस्फोट व अफेयर्स
मुनव्वरने २०१७ मध्ये जास्मिनशी पहिलं लग्न केलं होतं, या लग्नापासून त्याला एक मुलगा असून तो मुनव्वरजवळ राहतो. मुनव्वर आणि जास्मिन २०२२ मध्ये वेगळे झाले. त्याच्या पहिल्या पत्नीनेही दुसरं लग्न केलं आहे. घटस्फोटानंतर मुनव्वरने सोशल मीडियावर एन्फ्लुएन्सर नाझिला सिताशीला डेट केलं, पण त्यांचंही ब्रेकअप झालं, नंतर त्याच्या आयुष्यात आयशा खान आली पण ते दोघेही वेगळे झाले. त्यानंतर त्याने मेहजबीन कोटवालाशी मे २०२४ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोन वर्षांनी दोघांनीही आपल्या लेकीचं स्वागत केलं आहे.
