अलिकडे अनेक सिनेमांना रिलीजपूर्वीच वेगवेगळ्या कारणांमुळे विरोध होताना दिसतो. यापैकीच एक रिलीजच्या मार्गावर असलेला सिनेमा म्हणजेच ‘हम दो हमारे बारह’. या सिनेमाच केवळ पोस्टर रिलीज होताच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर मुस्लिम समुदायाने विरोध दर्शविला आहे. या सिनेमात अन्नू कपूर मुख्य भूमिका साकारत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हम दो हमारे बाराह’ या सिनेमात अभिनेते अन्नू कपूर मुख्य भूमिका साकारत आहेत. सिनेमाच्या पोस्टरमध्ये मध्यभागी बसलेल्या अन्नू कपूर यांच्या शेजारी काही महिला, पुरुष, लहान मुलं तसचं वकिल दिसत आहेत. लोकसंख्या वाढीवर आधारित य़ा सिनेमाच्या पोस्टरवर अनेकांनी टीका केली आहे. सिनेमाच्या पोस्टरवरून वाद सुरू झाला असला तरी दिग्दर्शक कमल चंद्रा यांनी टीकाकारांना संयम राखण्यास सांगितलं आहे. हा सिनेमा विशिष्ट समुदायावर नसून सिनेमा पाहून प्रेक्षक नक्कीच खुश होतील असा खुलासा दिग्दर्शक कमल चंद्रा यांनी केला आहे.

पत्रकार अयुब राणा यांने सिनेमाचं पोस्टर शेअर करत एक ट्वीट केलं आहे. “ज्या सिनेमात मुस्लिम समाज हा लोकसंख्या वाढीस कारण असल्याचं दाखवलं जातं त्या सिनेमाला सेन्सॉर बोर्ड कशी परवानगी देतं. सिनेमात मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यात आलंय. एका मुस्लिम कुटुंबाचा फोटो वापरून त्यावर हम दो हमारे बारह असं शिर्षक देणं म्हणजे इस्लामोफोबिया आहे” असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

या सिनेमाच्या पोस्टरमध्ये नावासोबतच एक टॅगलाईन देण्यात आलीय. “लवकरच चीनला मागे टाकू” असं यात म्हंटलं आहे. या पोस्टरवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तर सिनेमामधून कुणाच्याही भावना दुखावण्यात आलेल्या नाही असं स्पष्टीकरण दिग्दर्शकाने दिलं आहे. ईटाईम्सच्या वृतानुसार कमल चंद्रा स्पष्टीकरण देताना म्हणाले, “आमच्या सिनेमाचं पोस्टर अजिबात आक्षेपार्ह नाही. त्याकडे फक्त योग्य दृष्टीकोनातून पाहणं गरजेच आहे. विश्वास ठेवा आम्ही आमच्या सिनेमाद्वारे कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत नाही आहोत. सिनेमा पाहिल्यानंतर इतका संबंधित मुद्दा कुणाच्याही भावना न दुखावता मांडल्याचा लोकांना आनंद होईल. हा सिनेमा वाढत्या लोकसंख्येवर आधारित आहे. कोणत्याही समुदायाला लक्ष्य न करता आणि तो बनवण्यात आलाय.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim community angry on hum do hamare barah film poster islamophobia controversy kpw
First published on: 08-08-2022 at 15:15 IST