‘नच बलिये ६’ मध्ये थिरकणा-या ११ जोड्यांची नावांची घोषणा नुकतीच करण्यात आली. ९ नोव्हेंबरपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता हा रिअॅलिटी शो स्टार प्लस वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे. गेल्या सिझनप्रमाणेच यावेळेसही अभिनेत्री शिल्पा शेट्टी, दिग्दर्शक साजिद खान आणि नृत्य-दिग्दर्शक टेरेन्स लुईस हे परिक्षकाची भूमिका बजावणार आहेत. ‘नच बलिये ६’ मधील जोड्यांची नावे पुढीलप्रमाणे-

फोटो गॅलरीः ‘नच बलिए ६’ मधील सेलिब्रिटी जोड्या

१.  आम्रपाली गुप्ता – यश सिन्हा (पती-पत्नी)
२. ब्रुना अब्दुल्ला आणि प्रियकर उमर फारुक
३. गुरमित चौधरी – देबिना मुखर्जी (पती-पत्नी)
४. कनिका महेश्वरी – अंकुर घई (पती-पत्नी)
५. किकु शारदा – प्रियांका (पती-पत्नी)
६. राजू श्रीवास्तव – शिखा (पती-पत्नी)
७. राकेश वशिष्ठ – रिद्धी डोगरा (पती-पत्नी)
८. रित्वीक धानजानी आणि प्रेयसी आशा नेगी
९. लता सब्रवाल – संजीव सेठ (पती-पत्नी)
१०. रिपुदमन हांडा आणि प्रेयसी शिवांगी
११. विनोद ठाकुर – रक्षा

या पर्वात राजू श्रीवास्तव आणि किकु शारदा यांसारखे हास्यविनोदक असल्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे.