इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. लॅपिड यांनी गोव्याच्या चित्रपट मोहोत्सवात या चित्रपटाला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रपोगंडा’ करणारा म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी याचा विरोध केला. इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनीदेखील लॅपिड यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत वादातून काढता पाय घेतला. दरम्यान, आता लॅपिड यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पष्टीकरणात त्यांनी त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली आहे, शिवाय त्यांना हा वाद निर्माण होईल याची कुणकुणही लागली होती. त्या वक्तव्यानंतरचा दिवस त्यांनी प्रचंड तणावात काढल्याचं त्यांच्या स्पष्टीकरणात सांगितलं. आता यात आणखी भर पडली आहे. लॅपिड यांनी इतर ज्युरी मेंबर्सनी त्यांची स्टेटमेंट बदलल्याचा दावा केला आहे.

आणखी वाचा : “घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण…” नीना गुप्ता यांनी मांडलं भारतीय लग्नसंस्थेबद्दल मत

‘इंडिया टूडे’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना लॅपिड यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, की ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल केवळ त्यांचंच नव्हे तर इतर ज्युरीचंही सारखंच मत होतं. लॅपिड म्हणाले, “चित्रपट बघताना सगळे ज्युरी एकत्रच बसले होते आणि चित्रपट पाहून झाल्यावर त्यांचीसुद्धा हीच प्रतिक्रिया होती. याचे माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत, पण मी समजू शकतो की कोणत्यातरी दबावाखाली येऊन किंवा भीतीपोटी त्यांनी त्यांची वक्तव्यं बदलली असतील.”

इस्त्रायलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते लॅपिड या कार्यक्रमात चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना असे म्हणाले होते की, “द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला व्हलगर (अश्लील) तसेच प्रपोगंडा (विशिष्ट उद्देशाने प्रचार करण्याच्या हेतूने बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे,” असं लॅपिड म्हणाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nadav lapid says other juries at iffi changed their statements about the kashmir files avn
First published on: 30-11-2022 at 17:30 IST