दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्यने ( Naga Chaitanya ) गेल्यावर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं. डिसेंबर २०२४ मध्ये नागाने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी ( Sobhita Dhulipala ) लग्नगाठ बांधली. तेव्हापासून नागा व शोभिता नेहमी चर्चेत असतात. दोघं वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहायला मिळतात. अलीकडेच मुंबईत आयोजित केलेल्या वेव्स २०२५ या सोहळ्यात नागा व शोभिता उपस्थित राहिले होते. यावेळी शोभिताने सुंदर साडी नेसली होती आणि ती साडीच्या पदराने सतत पोट लपवतं होतं. यामुळेच शोभिता धुलिपाला लवकरच आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण, हे खरं आहे का? जाणून घ्या…
लग्नाच्या पाच महिन्यांनंतर नागा चैतन्य व शोभिता धुलिपाला यांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण याबाबत दोघांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, ‘ई-टाइम्स’ला एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शोभिता ही गर्भवती नाहीये. तिने अँटी-फिट कपडे घातले होते. मॅटरनिटी नाही. एका बदलामुळे कशी अफवा पसरते, हे खरंच आश्चर्यकारक आहे.
दरम्यान, नागा चैतन्यचं पहिलं लग्न समांथा रुथ प्रभुशी झालं होतं. दोघांनी २०१५ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती आणि २०१७मध्ये लग्न झालं होतं. पण काही वर्षांत दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आणि २०२१ मध्ये नागा व समांथाचा घटस्फोट झाला.
दोन वर्षांच्या डेटिंगनंतर नागा चैतन्यने केलं दुसरं लग्न
नागा व शोभिताची लव्हस्टोरी इन्स्टाग्रामवरील आस्क मी एनिथिंग या सेशनद्वारे सुरू झाली होती. एका चाहत्याने शोभिताला विचारलं होतं की, ती इन्स्टाग्रामवर नागा चैतन्यला फॉलो का नाही करत? तेव्हा तिला कळालं होतं की, नागा तिला फॉलो करत आहे. त्यानंतर इन्स्टाग्रामवरील डीएमच्या माध्यमातून आणि तेलुगू भाषेवरील प्रेमामुळे दोघांचं नातं आणखी खुललं. यानंतर नागा व शोभिता सतत एकमेकांशी बोलू लागले. अखेर एप्रिल २०२२मध्ये दोघांची पहिली ब्रेकफास्ट डेट मुंबईत झाली. दोन वर्ष डेट केल्यानंतर ८ ऑगस्ट २०२४ ला हैदराबादमध्ये दोघांचा साखरपुडा झाला आणि ४ डिसेंबर २०२४ ला दोघांचं हैदराबादमधील अन्नापुरना स्टुडिओमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं.