Naga Chaitanya and Sobhita Dhulipala : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने २०२१ मध्ये समांथा रुथ प्रभूबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर आता तो अभिनेत्री सोभिता धुलिपालाबरोबर लग्न करणार आहे. दोन वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला. चाहते या दोघांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात ४ डिसेंबर २०२४ ला नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा शाही विवाहसोहळा होणार आहे.

हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांचा हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या जोडप्याच्या लग्नाची तयारी आता सुरू झाली असून, शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) या दोघांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. आता सोशल मीडियावर हळदीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आलेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हळदी समारंभात दोघेही अगदी आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : ‘या’ अभिनेत्रीने ९० च्या दशकात केलेलं बोल्ड फोटोशूट; आईने पाहिल्यावर केलेलं असं काही की…, तिनेच केला खुलासा

हळदी समारंभात सोभिता धुलिपाला दोन लूकमध्ये दिसत आहे. सुरुवातीला तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच या वेशभूषेला साजेसा साधा मेकअप केला असला तरी ती दागिन्यांनी मढलेली आहे. तसेच हळदीच्यावेळी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे; तर नागा चैतन्यने त्यावेळी क्रीम रंगाचे आउटफीट परिधान केले आहे. दोघांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांना हळद लावताना फोटोत दिसत आहेत.

नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा हा विवाह सोहळा तेलुगू पद्धतीने मोठ्या शाही स्वरूपात पार पडणार आहे. त्यासाठी हैदराबादमध्ये जोरदार तयारीही सुरू झालीये. अशात चाहत्यांना आता या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्याची उत्सुकता आहे.

दरम्यान, नागा चैतन्यच्या अभिनयातील कारकि‍र्दीविषयी बोलायचे झाल्यास त्याने २००९ मध्ये ‘जोश’ या चित्रपटातून सिनेविश्वात पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने ‘लव्ह स्टोरी’, ‘थँक यू’, ‘कस्टडी’ अशा विविध चित्रपटांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली. लवकरच तो ‘थंडेल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२५ मध्ये त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : साई पल्लवीचा ३२२ कोटी रुपये कमावणारा चित्रपट OTT वर होणार रिलीज; कधी, कुठे पाहता येणार? वाचा

तर, सोभिता धुलिपालाच्या अभिनयातील कारकि‍र्दीविषयी बोलायचे झाल्यास, तिने ‘रमन राघव २.०’ चित्रपटातून तिच्या कामाला सुरुवात केली. सोभिताने बॉलीवूडमध्येही काम केले आहे. २०१७ मध्ये आलेल्या ‘बावर्ची’ चित्रपटात ती झळकली होती.

Story img Loader