Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement : तीन वर्षांपूर्वी समांथा रूथ प्रभूपासून विभक्त झाल्यावर तेलुगू अभिनेता नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. नागा चैतन्य आज साखरपुडा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बऱ्याच काळापासून तो व अभिनेत्री सोभिता धुलीपाला डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत्या. आता हे दोघेही आज (८ ऑगस्ट रोजी) साखरपुडा करून नातं अधिकृत करणार आहेत, असं वृत्त ‘द ग्रेट आंध्रा’ने दिलं आहे.

नागा चैतन्यचे वडील नागार्जुन मुलाच्या साखरपुड्याची माहिती सर्वांना देणार आहेत. त्यांच्या घरीच साखरपुड्याचा समारंभ होणार असून नागार्जुन या जोडप्याचे फोटो शेअर करतील, अशी माहितीही समोर आली आहे. पण अद्याप चैतन्य किंवा सोभिता दोघांपैकी कोणीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘दामिनी’चे शूटिंग करताना दिग्दर्शकाने प्रपोज केलं अन्…, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला प्रसंग; म्हणाली, “हा सगळा वाद…”

आतापर्यंत नागा चैतन्य किंवा सोभिता धुलिपाला या दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. मात्र, ते एकत्र सुट्टी घालवताना दिसतात. अनेकदा त्यांच्या पोस्टच्या लोकेशनवरून चाहत्यांनी ते एकत्र फिरायला गेल्याचे अंदाज बांधले आहेत. आता हे दोघेही आपलं नातं अधिकृत करणार असं म्हटलं जात आहे.

नागा चैतन्य व सोभिता धुलीपाला (फोटो – इन्स्टाग्राम)

Video: लग्नानंतर सहा वर्षांनी सेलिब्रिटी कपल होणार आई-बाबा; ‘असं’ पार पडलं डोहाळे जेवण, पाहा व्हिडीओ

नागा चैतन्य व सोभिता यांच्याबरोबरचा फोटो विदेशातील एका रेस्टॉरंटमधील शेफने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हे दोघेही अनेकदा रेस्टॉरंटमध्ये चाहत्यांना एकत्र दिसले. त्यांनी याबाबतचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर केले नसले तरी चाहत्यांनी मात्र सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

नागा चैतन्य व समांथा रुथ प्रभूचा घटस्फोट

Naga Chaitanya Samantha Ruth Prabhu divorce: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व अभिनेता नागा चैतन्य ही मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. २०१७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती, त्यानंतर अवघ्या चार वर्षांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले आणि २०१७ मध्ये लग्न केले. तब्बल चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर नागा चैतन्यचे नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी जोडले जाऊ लागले.