गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागाचैतन्य खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नागाचैतन्य आणि त्याची पत्नी समांथा अक्किनेनी हे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा समांथाने सोशल मीडियावरुन तिचे अडनाव काढून टाकल्यामुळे सुरु झाल्या होत्या. दरम्यान, नागाचैतन्य एका मुलाखतीमध्ये त्याच्या खासगी आयुष्याविषयी आणि आगामी प्रोजेक्ट विषयी बोलताना दिसला.

नागाचैतन्यने नुकतीच सुभाष के जहाँला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याचा आगामी चित्रपट ‘लव्ह स्टोरी’ विषयी सांगितले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘तुझा लव्ह स्टोरी हा चित्रपट खऱ्या आयुष्यात असलेल्या लव्ह स्टोरीपेक्षा मोठा आहे का??’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत नागा चैतन्यने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि समांथा घेणार घटस्फोट? नागार्जुन म्हणाला…

‘नाही, ही खऱ्या आयुष्यावर आधारित प्रेमकथा आहे. सई आणि मी आमची स्वप्न काय आहेत हे शोधण्यासाठी संघर्ष करत असतो. हा चित्रपट जातिव्यवस्था आणि लिंगभेदा सारख्या संवेदनशील मुद्द्यांना स्पर्श करणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी मला विशेष मेहनत घ्यावी लागली. दिग्दर्शक शेखर चित्रीकरणाच्या आधी एक महिना मला त्या ठिकाणी घेऊन गेले. मी सैराट हा चित्रपट पाहिला. ही माझ्या आयुष्यातील आता पर्यंतची आव्हानात्मक भूमिका होती’ असे नागा चैतन्य म्हणाला.

साई पल्लवी सोबत काम करण्याविषयी नागाचैतन्य म्हणाला, ‘देवा, त्याच्याविषयी विचारु नका. ती खूप शांत, माणूस म्हणून खूप चांगली आहे. तिच्यामुळे माझी प्रशंसा होणार आहे.’

काही दिवसांपूर्वी नागाचैतन्यने चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला होता. समांथाने तो रिट्विट करत नागाचैतन्यला शुभेच्छा दिल्या होत्या.