दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नागार्जुनने मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १०८० एकर वनभूमी दत्तक घेतली आहे. ग्रीन इंडिया चॅलेंजपासून प्रेरित होऊन नागार्जुनने १०८० एकर वनभूमी दत्तक घेतली आहे. तर नागार्जुनचा संपूर्ण कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नागार्जुन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत. “अक्किनेनी कुटुंबाने चेंगीचेर्ला वनक्षेत्रातील एएनआर अर्बन पार्कचा काही भाग दत्तक घेतला आहे आणि त्याची पायाभरणी केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे”, अशा आशयाचे कॅप्शन नागार्जुनने दिले आहे.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

या पार्कला नागार्जुनच्या वडिलांचं नाव नागेश्वर राव अर्बन फॉरेस्ट पार्क असं देण्यात येणार आहे. दरम्यान, या वनभूमीच्या पायापूजनच्या वेळी खासदार जे संतोष कुमार हे त्यांच्या कुटुंबियासोबत उपस्थित होते. तर नागार्जुनची कुटुंबामध्ये अक्किनेनी नागार्जुन, अमला, मुले नागा चैतन्य, निखिल आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. तिथल्या वनभूमीचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेनुसार २ कोटी रूपये देण्यात आले आहेत.

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

वनभूमी दत्तक घेण्याविषीय नागार्जुन म्हणाला, सध्या आपल्याला निसर्गाला जपायचं आहे. नुकताच देशात पर्यावरणास अनुकूल आणि आपले पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी ग्रीन इंडिया चॅलेंज कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अनुशंगाने अनेक झाडांची रोपे लावण्यात आले आहेत. मागे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार संतोष कुमार यांच्याशी मी वनभूमी दत्तक घेण्याविषयी भाष्य केलं होतं. त्यानंतर आम्ही अनेकदा याविषयावर सविस्तर भेटून चर्चा केली. तसेच एकदा मी एका स्टेजवर वनभूमी खरेदी करणार असल्याचं सुध्दा जाहीर सांगितलं होतं. त्यामुळे मला ही संधी सध्याच्या सरकारने दिल्याने मी त्यांचा ऋणी आहे. अर्बन फॉरेस्ट पार्कचं पायापूजन केल्याचा मला आनंद देखील होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

आणखी वाचा : पाकिस्तानी गायकाने दुबईत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली, व्हिडीओ पाहून नेटकरी करतायत स्तुती

इतकी मोठी जमीन दत्तक घेतल्यानंतर खासदार संतोष कुमार यांच्याकडून नागार्जुनचं कौतुक करण्यात आलं आहे. दत्तक घेतलेल्या जागेत झाडे लावण्यात येणार असून आज पासून त्या कार्यक्रमाला सुरूवात झाली असल्याचे खासदारांनी सांगितले. तसेच इतकी मोठी जमीन घेतल्याने ती अधिक सुरक्षित सुध्दा राहिलं असंही ते म्हणाले.