Nagarjuna Akkineni: दाक्षिणात्य सिनेविश्वाला नागार्जुन यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या ते त्यांचा मुलगा नागा चैतन्यच्या लग्नाच्या गडबडीत व्यग्र आहेत. सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला या दोघांच्या लग्नाच्या विविध विधी आणि काही समारंभाचे फोटो व्हायरल होत आहेत. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ पार पडला. लग्नाच्या लगबगीत सध्या नागार्जुनसुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

नागार्जुन यांच्या कारच्या कलेक्शनमध्ये नुकतीच आणखी एक आलिशान कार सहभागी झाली आहे. त्यांनी ‘लेक्सस एलएम एमपीवी’ ही महागडी कार खरेदी केली आहे. नुकतेच ते या कारच्या नोंदणीसाठी हैदराबादच्या आरटीओ ऑफिसमध्ये आले. त्यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

st corporation proposal for increase in bus fares
विश्लेषण : एसटी भाडेवाढ अटळ का? खिशाला किती फटका बसणार?
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
pushpa 3 part allu arjun vijay devarkonda
Pushpa 3 : पुष्पाचा तिसरा भाग येणार? ‘या’ कारणामुळे चर्चा झाल्या सुरू, नव्या भागात दाक्षिणात्य सुपरस्टारच्या एन्ट्रीची शक्यता
Naga Chaitanya and Sobhita Dhulipala wedding Allu Arjun, SS Rajamouli to attend guest list revealed
नागा चैतन्य-सोभिता धुलीपाला ६५० कोटींच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये करणार लग्न, सुपरस्टार्स लावणार कुटुंबासह खास हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding first photo
नागा चैतन्य दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात! लग्नातील पहिला फोटो आला समोर, सोभिताच्या लूकने वेधलं लक्ष
Thriller Action Movies On Netflix
नेटफ्लिक्सवरील ‘हे’ Top 5 अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
IND vs NZ AB de Villiers statement on Virat Kohli and Team India
IND vs NZ : ‘आता तो काळ गेला…’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटसह टीम इंडियाबद्दल एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य

हेही वाचा : ८ वर्षांच्या अफेअरनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आंतरधर्मीय लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

नागार्जुन, नागा चैतन्य आणि सोभिताला देणार गिफ्ट

नागार्जुन यांनी खरेदी केलेली ही कार त्यांच्यासाठी नसून नवीन जोडप्यासाठी असणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. नागार्जुन ही कार नागा चैतन्य आणि सोभिताला लग्नाचं गिफ्ट म्हणून देतील, असं म्हटलं जात आहे.

कारची किंमत किती?

नागार्जुन यांनी खरेदी केलेली ही कार मरून रंगाची असून याची किंमत २.५ कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. याची खरी किंमत अद्याप समजलेली नाही. कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार, लेक्सस एलएम एमपीवी कार एक हायब्रिड-इलेक्ट्रिक वाहन आहे.

हेही वाचा : अक्षराची मोठी फसवणूक! भुवनेश्वरीच्या प्लॅनमध्ये अधिपती सामील? मास्तरीण बाई भावुक…; पाहा प्रोमो

नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ऑगस्टमध्ये हैदराबाद येथे कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या साक्षीने त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर नागार्जुन यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर मुलाचे आणि नव्या सुनेचे फोटो पोस्ट करत याबाबत घोषणा केली होती. अशात आता ४ डिसेंबरला सोभिता आणि नागा चैतन्य यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

Story img Loader