साउथ स्टार अक्किनेनी नागार्जुन यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या सुपरस्टारने तेलुगूसह अनेक हिंदी व तमीळ चित्रपटांमध्येदेखील काम केलंय. नागार्जुन यांचे लाखो चाहते आहेत; जे त्यांना भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

अनेकदा सेलिब्रिटीज विमानतळावर किंवा इतर कुठेही दिसले, तर चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात. अशा वेळेस काही कलाकार त्यांच्याबरोबर फोटो काढतात; तर काही जण चाहत्यांचा हिरमोड करतात. नागार्जुन यांच्या एका चाहत्याचा असाच हिरमोड झाला आणि त्या चाहत्याला वागणूकदेखील चुकीच्या पद्धतीची मिळाली. नागार्जुन यांच्या चाहत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा… “ए काळी आली काळी आली…”, जुई गडकरीला लोक रंगावरून हिणवायचे, अभिनेत्री वाईट अनुभव सांगत म्हणाली, “मी खूप रडायचे…”

व्हायरल व्हिडीओ

नागार्जुन यांच्या चाहत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये नागार्जुन यांना भेटण्यासाठी एक दिव्यांग चाहता पुढे येतो. तो पुढे येताच अभिनेत्याचे बॉडीगार्ड्स त्याला मागे ढकलताना दिसतात. ढकलल्यानंतर तो दिव्यांग चाहता थोडा धडपडतो. हे घडल्यानंतरदेखील नागार्जुन हे काही प्रतिक्रिया न देता, त्यांच्या दिशेने चालत राहतात. या व्हिडीओत नागार्जुन यांच्यामागे अभिनेता धनुषदेखील चालताना दिसतोय.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागार्जुन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ट्वीट करीत या घटनेबद्दल माफी मागितली आहे. नागार्जुन यांनी लिहिलं, “हे नुकतंच माझ्या निदर्शनास आलं. असं घडायला नको होतं. मी त्या गृहस्थाची माफी मागतो आणि भविष्यात असं होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेईन.”

हेही वाचा… नववधू सोनाक्षी सिन्हाबरोबर थिरकली काजोल, झहीर इक्बालनेही धरला ठेका, Video Viral

नागार्जुन यांच्या चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं, “तो अपंग आहे. तो किती अपमानित झाला असेल.” तर दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “हे हृदयद्रावक आहे. त्या बॉडीगार्डनं असं करायला नको होतं.”

हेही वाचा… ‘पारू’ फेम शरयू आणि संजना थिरकल्या ‘नटरंग’ चित्रपटातील गाण्यावर, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, नागार्जुन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘कुबेर’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात धनुष आणि रश्मिका मंदानादेखील प्रमुख भूमिकांत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.