Tabu and Nagarjuna Movie: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून नागार्जुन यांची ओळख आहे. त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. आता ते त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. तब्बूदेखील या सिनेमात दिसणार असल्याचे म्हटले आहे.

नागार्जुन यांच्या चित्रपटात तब्बू दिसणार असल्याने चर्चा का होत आहेत? याचे कारण म्हणजे एक काळ असा होता की त्यांच्या जोडीने लक्ष वेधून घेतले होते. इतकेच नाही तर ९० च्या दशकात त्यांच्या लव्ह स्टोरीने लक्ष वेधले होते. त्यांच्या प्रेम कहाणीच्या मोठ्या चर्चा झाल्या.

१५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तब्बू व नागार्जुन वेगळे झाले…

काही रिपोर्ट्सनुसार, तब्बू व नागार्जुन १५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. नागार्जुन यांना त्यांच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. त्यामुळे तब्बूने नात्यातून माघार घेतली. मात्र, दोघांनीही अधिकृतपणे यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. आता या सगळ्यानंतर नागार्जुन व तब्बू पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Award Banner

नागार्जुन यांनी त्यांच्या १०० व्या सिनेमाची घोषणा केली. आता या प्रोजेक्टमध्ये तब्बूदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहते या दोघांना पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

तब्बू व नागार्जुन २८ वर्षानंतर दिसणार एकत्र

व्हरायटी इंडियाच्या रिपोर्टनुसार, ‘किंग १००’ या सिनेमात एका आई-वडील आणि मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या सिनेमात नागार्जुन व तब्बू यांच्याबरोबरच सुष्मिता भट्ट व विजयेंद्र प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

नागार्जुन तब्बूबद्दल म्हणाले होते की….

डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन यांनी तब्बूबद्दल वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की आम्ही खूप काळापासून एकमेकांना ओळखतो. ९० च्या दशकात अनेक चित्रपटात आम्ही एकत्र काम केले आहे. जेव्हा मी माझ्या १०० व्या सिनेमाबद्दल तब्बूला सांगितले. त्यावेळी तिने सिनेमात काम करण्यासाठी लगेच होकार दिला होता.

दरम्यान, तब्बू व नागार्जुन यांचा किंग १०० हा सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.