Malhar Patekar reacts on father Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) गोव्यात पहाटे निधन झाले आणि गुरुवारीच रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्याजवळच्या डोणजे गावातील नानाची वाडी या फार्महाऊसमध्येच नानांना अखेरचा निरोप देण्यात आला. रात्रीच नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार का केले? यामागचं कारण त्यांचा मुलगा मल्हार पाटेकरने सांगितलं.
बरेच लोक अंत्यसंस्काराला पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना निरोप देण्याची घाई का केली? असं विचारल्यावर मल्हार म्हणाला, “नाही. नाही. असं काहीच नाही. इतक्या रात्री का, उद्या का नाही? असं काही नाही. कारण त्यांचं निधन सकाळी लवकर झालं आणि बराच काळ झाला होता, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की अंत्यसंस्कार आजच करायचे.”
मल्हार पाटेकरचा व्हिडीओ
नानांच्या निधनानंतर मल्हार पाटेकरने सांगितल्या ३ गोष्टी
मल्हार पाटेकर पुढे म्हणाला, “पहिली गोष्ट, शारीरिकरित्या आपण सगळेच जाणार आहोत, तसेच आज नानासाहेब गेले. पण त्यांचं कार्य आणि कर्तृत्व असं आहे की नाना साहेबांसारखी व्यक्ती कुठेही जात नसते, आपल्यातच असते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या डोक्यात कायमच ही गोष्ट असायची की, मानवतेसाठी एकत्र येऊया आणि या जगाच्या भल्यासाठी काम करुया, ते जगाच्या प्रमाणावरती विचार करायचे. तिसरी गोष्ट अशी की यापुढचं जे काम आहे, नाम फाउंडेशनचं असो, निर्मला गजानन फाउंडेशनचं असो ते त्यांच्या डोक्यात जे काही होतं ते त्यानुसार केलं जाईल. आयुष्यभर त्यासाठीच काम करायचंय. माझ्यासाठी नानासाहेब इथेच आहेत. मी जर मान्य केलं की नानासाहेब गेलेत, तर मी संपेन त्यामुळे माझ्यासाठी नानासाहेब अजूनही आहेत, ते कुठेही जात नसतात. त्यांचं कर्तृत्वच असं आहे की ते अजरामर आहेत.”
नाना सगळी कामे पुढच्या पिढीला सोपवून गेले- मल्हार पाटेकर
मल्हार पाटेकर पुढे म्हणाला, “आश्चर्य वाटेल पण आजवर त्यांनी जे केलं ते सगळं काम हँडओव्हर करून ते गेले. नाम फाउंडेशनमध्ये सुद्धा, निर्मला गजानन फाउंडेशनमध्येही सगळं पुढच्या पिढीला सोपवून गेले. मी परत कुठेतरी जाऊन शून्यातून सुरुवात करतो, असा विचार त्यांच्या डोक्यात होता. तर हे कार्य आता आयुष्यभर सुरू राहो इतकंच. आमच्याकडून ते चालू राहील, माझं सर्वांनाच सांगणं आहे की तुम्ही आमच्याशी जोडले जा, फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात काम चालू आहे, त्यासाठी काम करू. नाम फाउंडेशनचं ऑफिस आहे, निर्मला गजानन फाउंडेशनचं ऑफिस आहे. आपण थेट काश्मीरपर्यंत काम करतोय. सिनेमांपासून ते शेवटी शेवटी दूर झाले तरी अशी सामाजिक कार्ये ते करत होते, कारण सिनेमापेक्षा त्यांना इथे जास्त आनंद मिळत होता. सगळं चांगलं चाललं होतं, त्यांची प्रकृती उत्तम होती, पण दुर्दैव असं की हार्ट अटॅकमुळे हे झालं.”
