Nana Patekar Demise news and Amitabh Bachchan KBC Tribute : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं ८ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गोव्यातील राहत्या घरी निधन झालं. पुण्यातील डोणजे येथील नाना वाडी येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. दरम्यान, नाना पाटेकरांना ओळखणाऱ्या, त्यांच्याबरोबर काम केलेल्या आणि न केलेल्या, त्यांच्या समाजकार्याचा आदर ठेवणाऱ्या प्रत्येकाने नानांविषयी भावना व्यक्त केल्या. आता हिंदीतील महानायक अमिताभ बच्चन यांनीही केबीसीच्या मंचावरून त्यांच्या भावनांना वाट मोकळी केली.

शिकवलेल्या गोष्टी आपल्यातच राहतात – अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन म्हणाले, “नाना पाटेकर आज सकाळी अचानक स्वर्गवासी झाले. एक अद्वितिय कलाकार, मित्र, शुभचिंतक आणि उत्कृष्ट समाजसेवक आपल्यात राहिले नाहीत. हे भारतीय चित्रपटसृष्टीवरच नव्हे तर त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला स्तब्ध करणारं आहे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, साधेपणा आणि सत्य बोलण्याचं धाडस यामुळे ते वेगळे ठरतात. काहीजण आपल्यातून निघून जातात, पण त्यांचा आवाज, समाजसेवा आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्यातच राहतात.”

“नाना तुम्हाला वैयक्तिकरुपाने माझे नमन”, असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कलेला प्रणाम केला. ते म्हणाले, “तुमच्या कलेला प्रणाम, जी कला तुम्ही मनापासून जगलात आणि आम्हाला समर्पित केलं. केबीसीच्या विशेष कार्यक्रमात तुम्ही अतिथी म्हणून आला होतात, तो क्षण कायम लक्षात राहील. त्यांनी आम्हाला फक्त प्रभावित केलं नाही तर इथं मिळालेल्या निधीचा त्यांनी ज्या कामासाठी वापर केला, ते त्यांच्या समाजसेवेचं उदाहारण आहे. पावसाच्या अभावामुळे पीडित असलेल्या महाराष्ट्रातील गावातील शेतकऱ्यांशी त्यांनी संपर्क साधला आणि वैयक्तिक रुपाने त्यांना मदत केली.” असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती परिवाराकडून नाना पाटेकरांना श्रद्धांजली अर्पण केली.

व्हिडिओ पोस्ट करताना अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनही दिलं आहे. त्यात ते म्हणाले, “आमचा मेसेजद्वारे सातत्याने संपर्क असायचा. पण आज त्यांचा मेसेज नाही आला”

नाना पाटेकरांच्या घरी नेमकं काय घडलं?

नाना पाटेकर यांना मध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला त्यासंदर्भात मेसेज केला होता. मात्र, रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. मित्राने मेसेज पाहताच ते पहाटे चार वाजता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ केअर टेकरला बोलावून रुग्णलायातून रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिकेबरोबर त्यांचं वैद्यकीय पथकही निवासस्थानी दाखल झाले. वैद्यकीय पथकाने नानांना सीपीआर दिला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथेही सीपीआर देण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.