ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५व्या वर्षी गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात दु:खद निधन झालं. प्रत्येक भूमिका जगणारे आणि समाजकार्य करणाऱ्या नाना पाटेकरांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेता रितेश देशमुखनेही नानांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसल्याचं म्हणत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काळजावर जणू वीज कोसळली – रितेश देशमुख

रितेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. रितेश पोस्ट शेअर करत म्हणाला, “आज शब्द थिजले आहेत, काळजावर जणू वीज कोसळली आहे. नाना गेले… या एका वाक्याने मन सुन्न, नि:शब्द झाले आहे. तुम्ही अभिनयाचे आकाश होतात. ज्याला तुलनेची सीमा नव्हती. तुमच्या अनोख्या शैलीने रसिकांच्या हृदयात काही अढळ घर केले. कधी पडद्यावरचा तेजस्वी नायक, कधी अंगावर शहारे आणणारा खलनायक, तर कधी गंभीर चेहऱ्यामागचा खट्याळ विनोद, प्रत्येक रंग तुमच्या अभिनयात खुलून आला. पडद्यावर तुम्ही हीरो होतात, पण पडद्यामागे त्याहूनही मोठे. तुमच्या संस्थेतून वाहत राहिली माणुसकीची निरंतर धारा. ब्लफमास्टर आणि हाउसफुल ५मध्ये तुमच्याबरोबर पडदा वाटून घेतला, हे माझे भाग्य.”

रितेश देशमुखने व्यक्त केली अपूर्ण राहिलेली इच्छा

रितेश पुढे म्हणाला, “पण एका मराठी चित्रपटात तुमच्याबरोबर काम करणे ही अपूर्ण ओढ आयुष्यभर उरी राहील. तुमचे बोल, तुमच्या गप्पा. पाठीवरची ती कौतुकाची थाप, सोबत केलेले ते खळखळते हसू, ही माझी खरी कमाई. कुटुंबीयांना, आप्तेष्टांना आणि लाखो चाहत्यांना माझी मन:पूर्वक सांत्यना खरच आज एका युगाचा अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजी.”

रितेशसह मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्यांच्या दु:खद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार नाना पाटेकर यांच्या मुलाने मल्हार पाटेकर यांनी आज पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती दिल्याचं म्हटलं जात आहे.