Nana Patekar Death Updates : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर डोणजे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लाडक्या नानांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. राजकीय तसेच सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार देखील नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. नानांच्या निधनाने मनोरंजनविश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मुलगा मल्हार पाटेकरने नानांना मुखाग्नी दिला आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ते गोव्यातील घरी होते. पहाटे हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

Live Updates

Veteran actor Nana Patekar, 75, dies of cardiac arrest in Goa

23:36 (IST) 8 Oct 2026

नाना पाटेकर अनंतात विलीन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर डोणजे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

22:45 (IST) 8 Oct 2026

नाना पाटेकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी डोणजे गावात जनसागर लोटला

22:42 (IST) 8 Oct 2026

नाना पाटेकरांना अखेरचा निरोप

राजकीय तसेच सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार नाना पाटेकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले आहेत.

21:49 (IST) 8 Oct 2026

नाना पाटेकरांना अखेरचा निरोप देताना मकरंद अनासपुरेंना अश्रू अनावर

21:41 (IST) 8 Oct 2026

नाना पाटेकर यांचं पार्थिव पुण्यातील फार्महाऊसवर

थोड्याच वेळात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

21:38 (IST) 8 Oct 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

ज्येष्ठ अभिनेते आणि माझे स्नेही, मित्र, मार्गदर्शक नाना पाटेकर यांचे पार्थिव आज पुण्यात स्वीकारले. राज्य सरकारतर्फे त्यांना यावेळी मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. एक हरहुन्नरी कलावंताला अखेरची मानवंदना देताना, श्रद्धांजली अर्पण करताना मन भरून आले होते.

19:34 (IST) 8 Oct 2026

नाना पाटेकरांचं पार्थिव पुण्याकडे रवाना, मुलगा मल्हार व पत्नी निलकांती पाटेकर यांनी घेतलं अंत्यदर्शन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झालं असून, त्यांचं पार्थिव पुण्याच्या दिशेने रवाना झालं आहे. ...सविस्तर वाचा
19:01 (IST) 8 Oct 2026
"नाना भाऊ...", सलमान खानने नाना पाटेकरांना वाहिली श्रद्धांजली

"नाना भाऊ Rest In Peace" सलमान खानची पोस्ट

17:30 (IST) 8 Oct 2026
"नाना काका...जावयासारखं प्रेम केलंत, स्वत: जेवण बनवून मायेनं खाऊ घातलंत", श्रेयस तळपदेची भावुक करणारी पोस्ट!

श्रेयस तळपदेची भावुक पोस्ट

नाना काका…सदैव माझ्यावर मुलासारखं नाहीतर जावयासारखं प्रेम करणारे, दिप्तीवर मुलीसारखं प्रेम करणारे, आमची कायम आठवणीने विचारपूस करणारे, स्वतःच्या हातांनी जेवण बनवून मायेनं खाऊ घालणारे.. त्यात एखादा पदार्थ आवडला तर आवर्जून ते बनवून स्वतः घरी आणून देणारे, हक्कानं रागवणारे पण तित्क्याच शांतपणे समजवणारे, मला चांगले साहित्य वाचायला सुचवून मग त्यावर सविस्तर चर्चा करणारे, हक्कानं एखाद्या निर्मात्याला मला फिल्ममध्ये कास्ट करा सांगणारे, कधी कधी त्यासाठी बळजब्रीही करणारे… अशा पद्धतीने आम्हाला सोडून जाल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण आमच्या घरी काही अडलं की दिप्ती म्हणायची अगोदर नाना काकांना फोन कर... पण आता तो फोन कोणी उचलणार नाही हे मनाला पटतच नाहीये काका…दिप्तीला फोन करून 'श्रेयसची काळजी घे' आदेश दिलेत.. पण इतरांच्या काळजीत तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलंत...You will be truly truly missed Kaka.

तुमचे श्रेयस आणि दिप्ती

https://www.instagram.com/p/DeOzcCqjAhy/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

17:24 (IST) 8 Oct 2026

Video: 'माझ्या सरणासाठी सुकी लाकडं काढून ठेवली आहेत', नाना पाटेकर स्वतःच्या अंत्यसंस्काराबाबत काय म्हणाले होते?

Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांनी मृत्यू आणि अंत्यसंस्काराबाबत केलेल्या वक्तव्यांची चर्चा होत आहे. ...अधिक वाचा
16:19 (IST) 8 Oct 2026

अमृता फडणवीसांनी नाना पाटेकरांना वाहिली श्रद्धांजली

"नाना पाटेकर हे केवळ ज्येष्ठ अभिनेते नव्हते, तर माझ्यासाठी एक मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि संवेदनशील सहृदयी व्यक्तिमत्त्व होते. गरीब मुलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी मला त्यांनी प्रोत्साहन तर दिलेच तसेच आमच्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ते उत्स्फूर्तपणे उपस्थितही राहिले.

त्यांची समाजसेवेची तळमळ, विलक्षण कलाप्रतिभा आणि उत्साही व्यक्तिमत्त्व सदैव स्मरणात राहील. मनःपूर्वक सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली..ॐ शांति"

https://www.instagram.com/p/DeOugZUiKV0/?utm_source=ig_web_copy_link&stkn=NTc4MTIwNjQ2YQ==

15:54 (IST) 8 Oct 2026
"नाना सर गेले...अस्सल मातीतला माणूस आज मातीशी एकरूप झाला", संकर्षण कऱ्हाडेची भावुक करणारी पोस्ट

नाना पाटेकर सर गेले...

खूप वाईट वाटलं... धक्का बसला!

मला कधी त्यांच्यासोबत काम करायची संधी नाही मिळाली...एकदा नाटकाच्या प्रयोगाला आले होते तेवढंच...

सगळ्यांसारखाच मीही त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आणि शैलीमुळे फिदा आहे त्यांच्यावर...मी लहानपणी नकला करायला लागलो तेंव्हा पहिला पाठ केलेला डायलॉग म्हणजे क्रांतिवीर मधला "आगये मेरी मौत का तमाशा देखने..."

त्याच सिनेमा मधला "देखा उजडे चमन... अच्छाई उतनीही करो जितनी अच्छी लगे..." हे वाक्यं ऐकून तर वेड्यासारखा इम्प्रेस होतो मी त्यांच्यावर...कितीतरी भूमिका आहेत.

"गुलाम ए मुस्तफा" मधला मुस्तफा

"यशवंत" मधला यशवंत लोहार

"प्रहार" सिनेमा कडवट मेजर चव्हाण

त्यांच्या कितीतरी हिंदी / मराठी सिनेमांमधल्या भूमिका त्यांच्या शैलीमुळे , आवाजामुळे तोंडपाठ व्हायच्या...

मला पाहता आलं नाही पण "हमीदाबाईची कोठी" या अजरामर मराठी नाटकामध्ये नाना सर "सत्तार" ही भूमिका करायचे... मी खूपदा इमॅजिन करूनच हरवलोय की काय कमाल केली असेल त्यांनी ही सत्तारची भूमिका...वागणं ही तसंच रोखठोक...कोणत्याही राजकारण्याला भर सभेत डायरेक्ट एकेरी हाक मारायचे... हे कमवावं लागतं हो!

गेले नाना सर... अस्सल मातीतला माणूस आज मातीशी एकरूप झाला...खूपच वाईट वाटलं...

नाना सर,

प्रत्यक्ष भेटून तुमच्याकडून खूप काही घेण्यासारखं होतं ती संधी गेली पण तुमचं क्रांतीवीर मधलं एक वाक्यं आम्ही सगळ्यांनी घेतलं तर तुमच्या प्रवासाला मानाचा मुजरा ठरेल...

ते म्हणजे दोन जातींच्या माणसांचं रक्तं एकत्रं करून तुम्ही म्हणता ते...

"बनाने वालेने इसमे फर्क नही किया तू कौन होता है फर्क करने वाला ..."

15:41 (IST) 8 Oct 2026

"नाना काकांचा परवा फोन आलेला...", 'नटसम्राट'मध्ये नानांच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या मृण्मयी देशपांडेची भावुक करणारी पोस्ट

मृण्मयी देशपांडेची भावुक करणारी पोस्ट

"मला काय बोलावं कळत नाहीये... नाना काका नाहीत ही बातमी आत्ता कळाली... परवा त्यांचा फोन आला होता... 'कशी आहेस? चांगलं काम करते आहेस ना?' - नेहमीप्रमाणे त्यांच्या स्टाईलमध्ये विचारलं... काका 'नटसम्राट'मध्ये बाप बनून आले आणि तो रोल त्यांनी फक्त माझ्याच नाही, तर बऱ्याच जणांच्या बाबतीत ऑफस्क्रीनसुद्धा निभावला... नाना काका, खऱ्या आयुष्यात तुम्ही वादळ होतात... इतक्या शांतपणे गेलात? विश्वास बसत नाही... माणूस जातो, नट राहतो; आणि तुम्ही तर नटसम्राट होतात!"

15:39 (IST) 8 Oct 2026

नाना यांचे अभिनय श्रेत्रापासून दूर असलेले दोन भाऊ काय करतात? पत्नी, मुलासह किती मोठं आहे पाटेकर कुटुंब

Nana Patekar Family Tree : मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५व्या वर्षी निधन झालं, नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पाटेकर कुटुंब किती मोठं आहे? जाणून घ्या... ...वाचा सविस्तर
14:26 (IST) 8 Oct 2026

'नटसम्राट'चे अकाली निधनाने पश्चिम विदर्भातील 'त्या' शेतकरी कुटुंबाला धक्का

बुलढाण्यात ११ वर्षांपूर्वी नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना अभिनेते नाना पाटेकर ...सविस्तर बातमी
14:26 (IST) 8 Oct 2026

माधुरीच्या ‘हॉट सीट’वर नाना पाटेकर येणार होते; पण ती भेट अधुरीच राहिली…

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर बसणार होते. त्यासाठी शुक्रवारी ते गोव्याहून मुंबईत येणार होते. ...सविस्तर वाचा
14:18 (IST) 8 Oct 2026

"नाना इतक्या लवकर जायला नको होतंस" सचिन पिळगांवकरांची भावुक पोस्ट

सचिन पिळगांवकर लिहितात, "अत्यंत दुःखद बातमी! भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आणि माझा प्रिय मित्र नाना आपल्या सर्वांना सोडून गेला. इतक्या लवकर जायला नको होतंस, नाना...भावपूर्ण श्रद्धांजली!"

https://www.instagram.com/p/DeOd5UyMC35/?utm_source=ig_web_copy_link&stkn=NTc4MTIwNjQ2YQ==

13:50 (IST) 8 Oct 2026

"चार-आणे पॉकेटमनी अन् वर्तमानपत्रात गुंडाळलेली चपाती", नाना पाटेकरांच्या संघर्षाचा KBC तील जुना VIDEO तुफान व्हायरल

Nana Patekar KBC Viral Video: "चार-आणे पॉकेटमनी अन् वर्तमानपत्रात गुंडाळलेली चपाती," अवघ्या २५ पैशांत दिवस काढणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या संघर्षाची कहाणी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा
13:49 (IST) 8 Oct 2026

नाना पाटेकरांचे ते शब्द पुन्हा चर्चेत; नाशिकमध्ये शेतकऱ्यांना दिला होता ‘हा’ सल्ला

तत्कालीन राजकीय घडामोडी लक्षात घेऊन पाटेकर यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना दिलेला सल्ला गुरुवारी त्यांच्या अकस्मात निधनाने पुन्हा चर्चेत आला आहे. ...सविस्तर बातमी
13:44 (IST) 8 Oct 2026

‘मी पूजापाठ करत नाही…’ असे म्हणणाऱ्या नाना पाटेकर यांनी ‘या’ विशेष कारणामुळे घरी गणेशोत्सवाची परंपरा जपली

नाना पाटेकर यांनी काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी घरातील गणेशोत्सवाची परंपरा का जपली आहे याचे उत्तर दिले होते. ...अधिक वाचा
13:27 (IST) 8 Oct 2026

'मन मोकळं करण्यासाठी आता कुणाकडे जायचे?…'' नानांच्या निधनावर शोक व्यक्त करताना प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा हळवा स्वर

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ...अधिक वाचा
13:06 (IST) 8 Oct 2026

'राघू मैना' चित्रपटात नाना पाटेकरांनी बजावली अजरामर भूमिका; ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले, 'बोलूही शकत..'

या चित्रपटातची गीते ज्येष्ठ कवी डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिले. ...अधिक वाचा
12:53 (IST) 8 Oct 2026

‘मृत्यू सतत आपल्याबरोबर असतो… मृत्यूवर विश्वास ठेवा’, नाना पाटेकरांचे 'ते' वक्तव्य; कलेसोबत विचारांची श्रीमंती लाभलेला अभिनेता हरपला

नानांच्या अनेक मुलाखती ऐकण्यासारख्या आहेत. विशेषतः त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची सकारात्मकता आणि विनयशीलता यांचे दर्शन होत असे. ...वाचा सविस्तर
12:37 (IST) 8 Oct 2026

नानांचा हा शेवटचा व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील!

नाना पाटेकर यांचा चार दिवस आधीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोव्यात एका कार्यक्रमात नाना पाटेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे.

https://twitter.com/Herman_Gomes/status/2108028340502413571

12:03 (IST) 8 Oct 2026

दुष्‍काळमुक्‍तीचा ध्‍यास बाळगणाऱ्या नाना पाटेकरांना विदर्भात करायचे होते जलसंवर्धनाचे काम!

नागपूरमधील कार्यक्रमादरम्यान जलसंवर्धनाच्या मुद्द्यावर ४ ते ५ तास सविस्तर चर्चा झाली होती, अशी माहिती कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांनी दिली. ...अधिक वाचा
11:58 (IST) 8 Oct 2026

नाना पाटेकर यांची मोडी लिपी शिकण्याची इच्छा अधुरीच राहिली; अहिल्यानगरचे इतिहास अभ्यासक डॉ. संतोष यादव यांनी सांगितली आठवण

नाना पाटेकर यांच्या जुन्या वस्तूंच्या आकर्षणातूनच इतिहास अभ्यासक डॉ. संतोष यादव यांच्याशी त्यांचा परिचय झाला. भेटीगाठी होऊ लागल्या. ...वाचा सविस्तर
11:57 (IST) 8 Oct 2026

"नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर कदाचित...", राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

Raj Thackeay on Nana Patekar : नाना पाटेकर यांचं आज निधन झालं असून राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. ...वाचा सविस्तर
11:43 (IST) 8 Oct 2026

नाना पाटेकरांच्या मदतीमुळे कोल्हापुरातील अस्थिरुग्ण शेखर कुलकर्णी चालू लागले

कोल्हापुरातील अस्थिरुग्ण शेखर कुलकर्णी यांच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी नाना पाटेकर व ‘नाम फाऊंडेशन’ने दीड लाख रुपयांची मदत पुरवून त्यांना पुनर्जन्म दिला. ...अधिक वाचा

nana patekar

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास