Nana Patekar wife Nilkanti Patekar: आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. नानांच्या निधनानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. विशेषतः त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांच्याबद्दल त्यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. “माझ्या पत्नीचे माझ्यावर खूप उपकार आहेत, तिच्यामुळेच मी अभिनय क्षेत्रात करिअर करू शकलो,” अशी जाहीर कबुली नानांनी दिली होती.

नाना पाटेकरांच्या पत्नीचं नाव निलकांती पाटेकर आहे. नाना व निलकांती यांनी प्रेम विवाह केला होता, पण लग्नानंतर काही वर्षांनी ते वेगळे राहू लागले. नाना पाटेकरांनी सांगितलं होतं की पत्नी निलकांती मुलगा मल्हार व सासूबाईंबरोबर राहायच्या.

पत्नीचे उपकार, तिच्यामुळेच अभिनयात करिअर करू शकलो – नाना पाटेकर

तुम्ही निलकांती यांना केव्हा भेटला होतात? ‘जात न पुछो साधु की’ या नाटकावेळी का? असा प्रश्न नाना पाटेकर यांना द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणालेले, “हो. तेव्हाच भेटलो होतो. ती बँकेत अधिकारी होती, ती नाटकात काम करायची. आम्हाला एका शोचे ५० रुपये मिळायचे आणि त्यावेळी तिला अडीच हजार रुपये पगार होता. मी १५-२० शो केले तर ७५० रुपये मिळायचे. पूर्ण महिना ३० शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरीही १५०० मिळायचे. ती मला म्हणाली, तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. त्यावेळी यशस्वी होऊ की नाही माहीत नव्हतं.”

nana patekar with wife nilkanti patekar
नाना पाटेकर व त्यांच्या पत्नी निलकांती पाटेकर

निलकांती यांनी सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर एका चित्रपटात काम केलं होतं, पण नंतर त्यांनी चित्रपट केले नाहीत. “मल्हार होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा राहायचो, ते एकत्र राहायचे. आई, मल्हार व नीलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच वेगळा राहत होतो,” असं नाना पाटेकर म्हणाले होते.

कोण आहेत नाना पाटेकरांच्या पत्नी निलकांती?

Who is Nana Patekar wife Nilkanti Patekar: निलकांती पाटेकर यांना लहानपणापासूनच नाटकांची आणि अभिनयाची आवड होती. पण, आवड जपत त्यांनी बँकेत नोकरी केली. १९७३ मध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चे सुवर्णपदक मिळाले होते. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध ‘आत्मविश्वास’ या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ मिळाला होता. निलकांती पाटेकरांनी छावा चित्रपटात काम केलं होतं.