ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५व्या वर्षी निधन झालं. गोव्यातील राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांनी आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नाना पाटेकरांनी आजवर मराठीसह हिंदीतही दमदार भूमिका साकारल्या, मात्र त्यांनी एकदा मल्याळम चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नाना पाटेकरांनी कुठल्याही मल्याळम दिग्दर्शकाने आजवर एकदाही त्यांना का विचारणा केली नाही असं म्हणत खंतही व्यक्त केली होती.

नाना पाटेकर यांनी तिरुवनंतपुरम येथे झालेल्या २८व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ केरळच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली असताना एकदा मल्याळम सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी नाना पाटेकर यांनी केरळशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल सांगितलं होतं.

नाना पाटेकरांनी सांगितलं केरळशी असलेलं खास नातं

नाना पाटेकर अनेक दशकांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळमध्ये गेले होते. IFFKमध्ये बोलताना त्यांनी केरळमधील तो अनुभव आजही आपल्या मनात असल्याचं सांगितलं. ‘मातृभूमी न्यूज’च्या वृत्तानुसार, नाना पाटेकर म्हणाले होते, “मी ३२ वर्षांपूर्वी पहिल्यांदा चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळमध्ये आलो होतो. तेव्हापासून इथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती फारशी बदललेली नाही. इथले लोक मनाने जास्त विचार करतात. त्यामुळे भाषा वेगवेगळ्या असल्या तरी संवाद साधणं सोप होतं. असंच असायला हवं.”

मल्याळम चित्रपटात काम करण्याची होती इच्छा

नाना पाटेकर यांनी त्यांच्या पाच दशकांच्या कारकिर्दीत एकाही मल्याळम दिग्दर्शकाने त्यांना चित्रपटाची ऑफर दिली नसल्याचं सांगितलं होतं.
याबद्दल बोलताना नाना पाटेकर यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “गेल्या ५० वर्षांत केरळमधील एकाही दिग्दर्शकाने माझ्याशी संपर्क साधला नाही… याचा अर्थ मला अभिनेता म्हणून आणखी सुधारण्याची गरज आहे. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन आणि तुम्हाला निराश करणार नाही.” नाना पाटेकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्यांनी कधीही मल्याळम चित्रपटात काम केलं नाही.

भारतीय चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकरांचा प्रवास

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून हिंदी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘परिंदा’ या गँगस्टरच्या भूमिकेमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. यानंतर त्यांनी अनेक व्यावसायिक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. ‘वेलकम’, ‘वेलकम बॅक’ आणि ‘राजनीती’ हे त्यांचे लोकप्रिय चित्रपट आहेत. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नटसम्राट’ या मराठी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं.

अनेक भाषांमध्येही केलं काम

नाना पाटेकर यांनी तमिळ चित्रपटसृष्टीतही काम केलं. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बोम्मलाट्टम’ चित्रपटातून त्यांनी तमिळ सिनेमात पदार्पण केलं. त्यानंतर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काला’ चित्रपटात त्यांनी रजनीकांत यांच्यासह काम केलं. अभिनयाबरोबर नाना पाटेकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं. ‘प्रहार: द फायनल अटॅक’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. त्यांच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी आणि तमिळ अशा विविध भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे.