नाना पाटेकर त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिले. त्यांनी त्यांच्या कामामधून अनेकांचं मनोरंजन केलं. मात्र नाना पाटेकर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार क्वचितच बोलताना दिसले. ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे अनेक व्हिडीओ आणि मुलाखती व्हायरल होत आहेत. अनेक जण सोशल मीडियावरही त्यांच्याबद्दल भरभरून बोलताना दिसत आहे. याच दरम्यान ते त्यांच्या मुलाचं कौतुक करत असतानाची मुलाखतही समोर आली आहे.

नाना पाटेकर यांना मल्हार पाटेकर हा मुलगा आहे. जो त्यांच्या ‘नाम फाऊंडेशन’साठीसुद्धा काम करतो. नाना पाटेकर यांनी त्याच्याबद्दल ‘सकाळ’शी संवाद साधताना कौतुक केलं होतं. त्यावेळी त्यांनी मल्हार पाटेकर किती जबाबदार आहे आणि त्याचे कान ओढण्याची वेळ त्यांच्यावर कधीच आली नाही असं सांगितलं होतं.

नाना पाटेकरांनी लेकाचं केलेलं कौतुक

मुलाखतीत नाना पाटेकर लेकाबद्दल विचारल्यानंतर म्हणालेले, “मस्त नातं आहे आमचं, आम्ही एकदी बरोबरीने असतो. चुकतोय असं वाटलं की कान धरायचा. मुस्काटीत मारण्याची वेळ येत नाही. कानही धरायची वेळ येत नाही. हुशार मुलं आहे. त्यामुळे छान नातं आहे. नामचं काम सुरू झाल्यापासून मल्हारला वेळच नाहीये. त्याला फक्त नाम एवढंच.” नाना पाटेकर पुढे किस्सा सांगत म्हणालेले, “आता परवा तो गेला मला माहीतच नाही. हळद काढायला आलीये. हळदीच्या पानामध्ये मासे ठेवायचे त्यावर मसाला टाकायचा आणि निखाऱ्यावर नुसतं थोडंशी आग द्यायची. खूप मस्त लागतं. तेव्हा मी म्हटलं बोलव त्याला जेवायला तर मला समजलं की तो ऑफिसला गेला नामच्या. मी म्हटलं मला सांगितलं नाही तेव्हा म्हणाला बाबा आराम करत असतील म्हणून नाही कळवलं.”

नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर

मल्हार पाटेकर नाना पाटेकर यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्यांचा मुलगा असूनही अगदी त्याच्या वडिलांप्रमाणेच साध्या पद्धतीने आयुष्य जगतो यासाठी त्याचं कौतुकही होतं. मल्हार नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस कंपनीसाठीही काम करतो. त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलंय.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तो त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीदरम्यान भावुकही होताना दिसला. वडीलांच्या अचानक झालेल्या निधनानंतर हा धक्का पचवत तो माध्यामांशी संवाद साधताना यापुढेही तो कायम नाम फाऊंडेशनबरोबर काम करत राहील असं म्हणाला. त्याचं त्याच्या वडिलांबरोबर खूप घट्ट नातं होतं.